Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

काका – पुतण्याच्या सरकारपासून बाजूला जाऊन हे शिवसेना भाजप सरकार सामान्य लोकांसाठी काम करत आहे -केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे

पुणे:- सर्वात फास्ट काम राज्यात शिवसेना आणि भाजप युतीची सरकार करत आहे. जनतेने या जोडी ला पाच वर्षासाठी कौल दिला होता.पण आत्ता ही जोडी पाच वर्षाचा काम येणाऱ्या काळात करतील. एक हताश सरकार,निराश सरकार आणि काका – पुतण्याच्या सरकारपासून बाजूला जाऊन हे शिवसेना भाजप सरकार सामान्य लोकांसाठी काम करत आहे.अशी टीका केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचं नाव न घेता केली आहे .
पीएमपीएमएल च्या पुणे स्टेशन ई बस डेपोचा उदघाटन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे स्टेशन डेपो येथे संपन्न झाला.यावेळी कार्यक्रम झाल्यानंतर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे हे पत्रकारांशि बोलत होते.
महेंद्रनाथ पांडे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारवर स्तुतीसुमने उधळली आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने 62 दिवसांत 751 लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. शिंदे – फडणवीसांचे शिवसेना भाजप सरकार अतिशय फास्ट काम करत आहे. मला वाटत 5 वर्षासाठी जो जनादेश होता ते काम उरलेल्या वेळेत हे सरकार पूर्ण असंच दिसतंय. असे महेंद्रनाथ पांडे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading