fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

माहेरहून पन्नास लाख रुपये दे नाहीतर तुझ्या नावऱ्याचं दुसरं लग्न लावून देतो; सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ   

पुणे : माहेराहून पन्नास लाख रुपये दे नाहीतर तुझ्या नावऱ्याचं दुसरं लग्न लावून देतो. तू म्हातारी झाली आहेस. तू निघून जा, असे म्हणत सासरच्या मंडळींकडून विवाहितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांगावी पोलिस ठाण्यात पती, सासू – सासरे व नणंद यांच्या विरोधात  कौटुंबिक हिमचार कलमांन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय व्यंकट  जाधव, अविद्या व्यंकट जाधव, व्यंकट चंद्रकांत जाधव व स्वाती महेश कांबळे (सर्व राहणार पिंपळे सौदागार) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पिडीत विवाहित महिला सुवर्णा धनंजय जाधव (वय – 37) यांनी सांगावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला आणि आरोपी  महेश यांचा 2008 मध्ये विवाह झाला असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मात्र, पहिली मुलगी झाली तेव्हापासून मुलगीच झाली ,या कारणावरून सासरच्या मंडळींकडून या विवाहितेला त्रास द्यायला सुरूवात झाली. वारंवार माहेरून पैसे घेवून व घरकामामुळे सुवर्णा हिला कौटुंबिक हिमचाराच्या घटनांना सामोरे जावे लागत होते.

त्यातच काही दिवसांपूर्वी तू म्हातारी झाली आहेस. तू निघून जा, आम्ही आमच्या मुलांचे दुसरे लग्न लावून देणार आहोत, असे म्हणून सासरच्या मंडळींनी सुवर्णाला पुन्हा त्रास द्यायला सुरूवात केली. हा त्रास सहन न झाल्याने तिने घडलेला प्रकार माहेरी सांगितलं. त्यावर पन्नास लाख रुपये दे, आम्ही तुला सांभाळतो, असा अजब युक्तिवाद सासरच्या मंडळींनी सुवर्णाच्या माहेरच्यां समोर केला. इतकेच नव्हे तर त्यांच्या समोर तिला मारहाण देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी पिडीत विवाहित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading