Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

लोकशाहीचा ‘४था स्तंभ’ असलेल्या न्यायसंस्थेपुढे, शिव छत्रपतींच्या ‘न्याय-निती’चा आदर्श हवा.. काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे – फणी आळी तालीम सार्व गणेशोत्सव मंडळाने “शिवरायांची न्यायनिती” या देखाव्याच्या ऊदघाटन ऊद्योजक, भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट चे विश्वस्त  पुनीत बालन यांचे हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात, “लोकशाहीचा ‘४था स्तंभ’ असलेल्या ‘प्रजासत्ताक भारत देशात’, शिव छत्रपतींच्या ‘न्याय-निती’चा आदर्श ऊभा आहे, या कडे न्यायसंस्थेचे लक्ष वेधणे आज काळाची गरज असल्याचे”, वक्तव्य काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. पुनीत बालन यांनी गणेशोत्सवात मंडळांना केलेली मदत त्यांचे दातृत्व दर्शवते..असे ही सांगितले..

ऊद्योगजक घराण्यांनी ‘सामाजिक दायीत्वाची गरज पुर्ण करण्यासाठी, डॅा मनमोहनसिंगांच्या ‘युपीए सरकारने’ देशात प्रथमच ‘सीएसआर’ (कार्पोरेट सोशल रीस्पॅान्सीबीलीटी) हा कायदा आणला व त्यामुळे मोठ्या सामाजिक गरजा पुर्ण करणारे प्रकल्प होऊ शकले, असेही  तिवारी यांनी या प्रसंगी सांगितले..!
मंडळाचे हे ७६ वे वर्ष असुन, उद्योजक व गणेशभक्त पुनीतजी बालन यांनी पुणे शहरातील गणेशोत्सव कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतांना, मंडळांनी सामाजिक बांधिलकी जोपासत, सामाजिक व नागरी ऊपक्रम राबवावेत” असे सांगितले..! मा पुनीत बालन यांचा मंडळाचे वतीने अघ्यक्ष ओंकार काळे यांनी शिंदेशाही पगडी व तलवार देऊन सत्कार करण्यात आला..!


या प्रसंगी मा नगरसेवक रविंद्र धंगेकर, योगेश समेळ यांची भाषणे झाली.. या प्रसंगी गणेश नलावडे, प्रा वाल्मिक जगताप, इंटक कामगार नेते राजेंद्र खराडे, नुरूद्गीन ईमानदार, गोपाळ पायगुडे, महेश मोरे, भोईराज समाजाचे पंच नागेश खडके, जनार्दन पवळे, संघाचे कार्याध्यक्ष राकेश डाखवे, अनिल खराडकर, जगदीश भुतडा त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष ओंकार काळे, खजिनदार किरण हूलावळे सक्रेटरी, आशुतोष मेमाणे, कार्याध्यक्ष योगेश दवे, अल्ताफ चांद मणियार, गणेश परदेशी, ओंकार शितोळे, अभिषेक खराडे, यश अनवेकर, मयुर घोडखिंडी इ उपस्थित होते..!
शिव-चरीत्रातील प्रसंग ‘अफजल खानाचे वधा नंतर (वैर हे अफजल खान सोबत होते मुलांसोबत नाही, असे सांगुन) त्याचे दोन्ही पुत्रांना’ महाराज सोडून देतात व अफजल खानचे मृत्यु संस्कार त्यांचे घर्म रीवाजा प्रमाणे करण्याचे व त्याचे कबरीवर दिवा-बत्ती करण्याचे आदेश देतात… ‘स्वराज्याचा शत्रू तो आपला शत्रू अन्यथा केवळ धर्म ऱ्भावनेने मुस्लिमांशी शत्रुत्व नाही’.. हीच शिव छत्रपतींची “तत्वांवर आधारीत न्याय-निती” होती..!! .आभार प्रदर्श महेश मोळावडे यांनी केले..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading