Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिंदे व फडणवीस सरकारने लोकशाहीची थट्टा केली – नाना पटोले

पुणे : राज्यात दोन-तीन महिने शिंदे व फडणवीस सरकार हे स्थापन झाले अजूनही प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही. त्यावर विरोधी पक्ष सतत टीका करत आहेत. की हे सरकार अजूनही मलाही खाण्यात व्यस्त आहे यांना राज्यातील जनतेशी काहीही घेणेदेणे नाही.लोकशाहीची थट्टा करण्याचं काम हे राज्यातील सरकार करत आहे. अशी टीका नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे दौऱ्यावर असताना मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीची यावेळी नाना पटवले यांनी आरती आणि पूजा केली यावेळी ते बोलत होते.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी भारतीय काँग्रेसचे देशाबाहेरील  कामकाजासाठीचे सचिव विरेंद्र वशिष्ठ यांनी केली आहे. यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारल असता ते म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत आमच्या कडून कुठलीही माहिती गेली नाही.कशाला बातम्या करत आहे.महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बातम्या करा.अस यावेळी नाना पटोले म्हणाले.
गेली 2 वर्ष कोरोनाच्या महामारीत आमची संस्कृती आमचं धर्म यापासून आपण दूर झालो होतो.आत्ता कोरोना मुक्त झाल्यानंतर आपण उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहोत.या सणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा महागाई आहे.विघ्नहर्ता च्या समोर आम्ही प्रार्थना करतो की देशात आणि राज्यात जे सत्तेत बसले आहे त्यांना सद्बुद्धी देव.महागाई आणि बेरोजगार तरुणांच्या हाती काम मिळावं अशी बप्पा चरणी प्रार्थना केली अस यावेळी पटोले म्हणाले.
गणेशोत्सव निर्बंध मुक्त होण्यावर शिंदे सरकार श्रेय घेत आहे.यावर पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव हे कमी झाले आहे.आणि पेट्रोल डिझेल चे दर कमी झाले आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहे की माझ्या नशिबाने भाव कमी झाले.आपल्याकडे म्हण आहे कावळा बसला आणि फांदी पडायला तस कोरोना कोणी आणला त्यावर जायचं का.यांच्या कर्मामुळे कोरोना आला होता आणि ते देशाने भुगतल.त्याच ही श्रेय घ्यायला लावा ना यांना असा टोला यावेळी पटोले यांनी दिला.
मुंबई येथे मनसेच्या कार्यकर्त्याकडून महिलेला मारहाण झाली आहे.यावर नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री अधिवेशनात विरोधकांना धमकावत असल्याचं दिसले याआधी महाराष्ट्रात अस कधी झालं नव्हत.महाराष्ट्राला गुजरात बनवायचं प्रयत्न सुरू आहे का ? महाराष्ट्र हा पुरोगामी असून अश्या विचारधारेला कुठेही थारा नाही.ज्या पद्धतीने एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे.तो जो माणूस ज्या पक्षाचा आहे.त्यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जात आहे.त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की त्यांना कशी ताकत मिळाली असेल.या घटनेचा मी निषेध करतो अस यावेळी नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading