Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षाच्या निकालातील त्रुटी दूर कराव्यात – अभाविप

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाअंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या इंजिनिअरिंग परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. परंतु या निकालानंतर अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये इंजिनिअरिंग च्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निकालामध्ये विध्यार्थी नापास होण्याचे प्रमाण अधिक आहे.

अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ४०-६०% इतके आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. निकालासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. तरी इंजिनिअरिंग च्या निकालातील तांत्रिक बाबी तपासून सुधारित निकाल लावण्यात यावा यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कडून परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे सरांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांचा नापास होण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे निकालात काही त्रुटी असतील तर त्यामध्ये सुधारणा करावी,असे मत अभाविप प्रदेश सहमंत्री आनंद भुसनर यांनी व्यक्त केले. प्रशासन या विषयावर बैठक घेऊन योग्य ती कारवाई करेल असे परीक्षा संचालकांनी सांगितले.यावेळी अभाविप पुणे विद्यापीठ उपाध्यक्ष वैभव मुंडे, जिल्हा विद्यार्थी विस्तारक आंबादास मेव्हणकर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading