Thursday, May 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

शहाजी बापू म्हणाले दोन महिन्यातील राज्य सरकारचा कारभार ‘एकदम ओक्के’

पुणे : राज्यात एकनाथ शिंदे व फडणवीस सरकार दोन-तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले आहे. त्यावर नागरिकांनी व विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.काही राजकीय घटना घडल्या. त्यामुळे सरकार बनल असून चांगलं चालू आहे.अनुभव आहेत, दोन महिन्यात सरकारचा कारभार चांगला.सरकारला यश येईल. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

आमदार शहाजी बापू पाटील हे आज पुण्यातशारदा गजानन मंडळा तर्फे दर वर्षी दिल्या जाणाऱ्या *पुरस्काराचे वितरण आणी कबड्डी व ढोल ताशा स्पर्धेचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रमाला उपस्थिती लावली तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला.

बंडखोर चाळीस आमदारांपैकी दहा ते बारा आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते आम्हाला फोन करून त्यांची चूक कबूल करत आहेत. त्यामुळे हे आमदार शिवसेनेत परततील असा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यावर बापू पाटील म्हणाले,चंद्रकांत खैरे औरंगाबादला रहातात 10 ते 15 आकडा म्हणतात,त्यांना आकडा माहिती नाही आणि उगाच ढगात गोळया मारत आहेत. असा टोला शहाजी बापू पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांना लगावला.
शहाजी बापू पाटील म्हणाले,प्रत्येक आमदाराला अपेक्षा आहेत.,सुहास कांदे नाराज नाहीत वाटत नाही ते नाराज असतील. तर त्यांनी मला फोन केला असता. असे पाटील म्हणाले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची प्रत्येक शिवसैनिक आतुरतेने वाट पाहत असतो. मात्र, यंदा शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवाजी पार्कवरील हा दसरा मेळावा होणार की नाही आणि झाला तर तो ठाकरे गट घेणार की शिंदे गट घेणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यावर शहाजी बापू पाटील म्हणाले,दसरा मेळावा वातावरण दिसुन आलं नाही.मेळावा जवळ आल्यावर मुख्यमंत्री काय धोरण घेतात यावर आहे.मुख्यमंत्री उपस्थितीतच मेळावा व्हावा अशी आमची इच्छा आहे. असे पाटील म्हणाले.

५० खोके, सर्व ओके असे वारंवार बोलले जात आहे. म्हणून आपण ओके तर ओके असे बोललो. मात्र याचा अर्थ आपण ५० खोके घेतले असा होत नाही. आपण बोललो नाही व जे सांगितले त्याचा विपर्यास करून माझ्या विरोधात आंदोलन करणे म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे. असे गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यावर बापू पाटील म्हणाले, इतिहासात क्रांती झाली तसे झालं आम्ही केलं. काहीही बोलतात.आम्हाला डाळींब भरण्याची खोके माहिती आहेत. असे शहाजी बापू पाटील म्हणाले.

शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत असे तिथले नागरिक म्हणत आहेत. त्यावर बापू पाटील म्हणाले,माझ्या मतदारसंघात एकही खड्डा नाही.  सांगोला फक्त काम सुरू आहे तो हायवे काम सुरू आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading