Saturday, May 9, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘दूसरी मॉं’साठी नेहा जोशी व आयुध भानुशाली आले एकत्र

भारतीय टेलिव्हिजनवरील लोकप्रिय आई-मुलाची जोडी नेहा जोशी व आयुध भानुशाली पुन्‍हा एकदा एण्‍ड टीव्‍हीवरील आगामी कौटुंबिक मालिका ‘दूसरी मॉं’मध्‍ये एकत्र पाहायला मिळणार आहे. निश्चितच ही जोडी पुन्‍हा एकत्र येण्‍यास उत्‍सुक असेल. आगामी कौटुंबिक मालिका ‘दूसरी मॉं’ ही उत्तर प्रदेशमध्‍ये राहणारी महिला यशोदाची (नेहा जोशी) कथा आहे, जी तिचा पती, दोन मुली व सासरच्‍या माणसांसोबत आनंदाने राहत असते. पण ती आणि तिचा पती नकळतपणे त्‍याचा अवैध मुलगा कृष्‍णाला (आयुध भानुशाली) दत्तक घेतात, तेव्‍हा त्‍यांचे आनंदी व शांतमय कौटुंबिक जीवन अस्‍ताव्‍यस्‍त होऊन जाते.


 ‘दूसरी मॉं’मध्‍ये आयुधला पुन्‍हा काम करण्‍याबाबत सांगताना यशोदाची भूमिका साकारणारी नेहा जोशी म्‍हणाली, ”मी कधीच विचार केला नव्‍हता की, आयुध आणि मला पुन्‍हा एकत्र काम करण्‍याची संधी मिळेल. आम्‍ही खूप आनंदित व उत्‍साहित झालो आहोत. मागील मा‍लिकेमधील आमच्‍या भूमिका संपल्‍यानंतर देखील आम्‍ही नेहमी एकमेकांच्‍या संपर्कात राहिलो आहोत. आम्‍ही वेळात वेळ काढून एकमेकांना कॉल, मेसेज केले आणि भेटलो. आमच्‍यामधील नाते अत्‍यंत जिवलग व विशेष आहे. तो माझ्यासाठी मुलासारखा आहे. आम्‍ही एकमेकांची खूप काळजी घेतो. म्‍हणून मला मालिका ‘दूसरी मॉं’साठी आम्‍ही पुन्‍हा एकत्र येण्‍याचे समजल्‍यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आणि मी आयुधपेक्षा सर्वोत्तम सह-कलाकाराची अपेक्षा करू शकत नाही. आम्‍ही नेहमी एकत्र वेळ व्‍यतित करताना धमाल केली आहे आणि आता आम्‍ही बराच वेळ खेळण्‍यामध्‍ये, गप्‍पागोष्‍टी करण्‍यामध्‍ये आणि तालीम करण्‍यामध्‍ये व्‍यतित करणार आहोत. मला खात्री आहे की, प्रेक्षक आमच्‍या वावरण्याचे कौतुक करतील आणि पडद्यावर पूर्णत: वेगळ्या अवतारामध्‍ये व कथानकामध्‍ये आमच्‍या आई-मुलाच्‍या जोडीला पाहण्‍याचा आनंद घेतील.” 

आयुध म्‍हणाला, ”मला पुन्‍हा एकदा माझ्या आवडत्‍या सह-कलाकार व ऑन-स्क्रिन आई नेहा जोशी यांच्‍यासोबत काम करताना आनंद होत आहे. त्‍या माझे संरक्षण करतात आणि त्‍यांनी नेहमी माझी काळजी घेतली आहे. आम्‍ही नेहमी एकमेकांच्‍या संपर्कात राहिलो आहोत, पण मला त्‍यांना दररोज पाहायला मिळत नव्‍हते. पण मालिका ‘दूसरी मॉं’मुळे आम्‍हाला एकमेकांसोबत खूप वेळ व्‍यतित करायला मिळणार आहे. मला त्‍यांना बरेच काही सांगायचे आहे आणि शूटिंग सुरू होण्‍याची मी उत्‍सुकतेने वाट पाहत आहे. त्‍या आसपास असल्‍यास मला खूप आनंद होतो..”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading