Tuesday, May 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पालकमंत्री नेमणूक लवकरच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे:राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे नवीन सरकार स्थापन होऊन दोन  महिने झाले. दोन  महिन्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे मंत्रिमंडळ खाते वाटप पार पडले. तेव्हाही देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे लवकरात लवकर खाते वाटप होईल असे म्हणत होते. त्यावरून विरोधी पक्षांनी एकनाथ देवेंद्र फडणवीस सरकारची लवकरात लवकर या वाक्यामुळे खिल्ली उडवली होती.तरी अजून प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री हा मिळाला नाही. विरोधी पक्ष सारखे विचारत आहेत की पालकमंत्री कधी प्रत्येक जिल्ह्याला भेटेल. त्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकातील वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासाठी भेट दिली. तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले प्रत्येक जिल्ह्याना लवकरात लवकरचं पालकमंत्री मिळतील. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले‌.


पुण्यातील नरेंद्र मित्र मंडळाने राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर हा देखावा साकारला होता. ‘सत्ताधाऱ्यांचे समुद्रमंथन आणि कार्यकर्त्यांचे मरण’ या नावाने सादर होणाऱ्या देखाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समोरासमोर दाखवण्यात आले आहे. हे दोघे सत्तेचे समुद्रमंथन करताना दाखवण्यात आले होते. या सगळ्यात सामान्य जनतेचे कशाप्रकारे मरण होत आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न होता. मात्र, या देखाव्यावरून वाद निर्माण होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी या देखाव्याला परवानगी नाकारली. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले,
पुण्यातल्या देखावा बाबत मला माहिती नाही. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी नक्की झाली आहे का ‌ असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विसरला असता . त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले,कोकणात जाणाऱ्या गाड्याना टोल मधून माफी दिली आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading