Saturday, May 9, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मृत गोविंदांच्या कुटूंबियांना दहा लाख रुपयांची मदत 

मुंबई : दहीहंडी उत्सवा दरम्यान दुर्देवाने विलेपार्ले येथील संदेश दळवी (२३) या गोविंदाचा मृत्यू झाला होता. राज्य शासनाच्या वतीने त्याच्या कुटूंबियांना दहा लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे.

याविषयी विधानसभेत माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोरोना कालावधीत दोन वर्षे सण साजरे करता आले नाही. आता कोरोनाचे सावट कमी झाल्याने पारंपरिक सण साजरे करण्यात येत आहेत. नुकताच दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मृत गोविंदांच्या कुटूंबियांना १० लाख, दोन अवयव गमावल्यांना ७.५० लाख, जखमींना ५ लाख रुपये आणि सर्वांवर मोफत उपचाराची घोषणा केली होती. या सणाच्यावेळी सर्व जखमी गोविंदावर योग्य उपचार व्हावेत, कुणाचाही मृत्यू होऊ नये, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सात अधिकाऱ्यांचे पथक नेमले होते. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यांशी संपर्क साधण्यात आला होता.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading