मी दुसऱ्या पक्षावर टीका कधी करत नाही माझा नवरा काय करतो यावर लक्ष असते -शर्मिला ठाकरे
पुणे : सत्ताधारि व विरोधकांमध्ये कुठलाही मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप हे सारखेच होत असतात. त्यावर वेगवेगळे पक्ष आपले विचार मांडत असतात. मी इतर पक्षांवर टीका करणार नाही. सरकार काय करत आहे हे नाही. तर माझा मुलगा काय करत आहे, माझा नवरा काय करत आहे किंवा माझा पक्ष काय करत आहे, याच्यावर मी लक्ष ठेवून असते, असे मनसेच्या नेत्या व राज ठाकरे यांच्या पत्नीशर्मिला ठाकरे पुण्यात पत्रकारांची संवाद साधताना म्हणाल्या.
शर्मिला ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत तेव्हा त्यांनी पुण्यातील भांडारकर रोडवरील गरिमा कलादालन चे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते पार पडले तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
शिंदे व फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा झाला पण त्यात महिलांना काही स्थान मिळाले पुढचा मंत्रिमंडळ विस्तार दहा दिवसातहोणार आहे. त्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या, पुढचा मंत्रिमंडळाचा विस्तार दहा दिवसात होणार आहे.असे ऐकले आहे. त्यावेळी नक्की महिलांना स्थान मिळेल, असा विश्वास शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, भाजपाकडे चांगल्या महिला आहेत. पंकजा मुंडे आहेत, त्यांच्याकडे मंत्रीपद गेले तर चांगले आहे. त्यांनी मागच्यावेळी चांगले काम केले होते. असेशर्मिला ठाकरे म्हणाल्या. तर महिला आणि बालविकास हे खाते महिलेकडे असेल तर अधिक चांगले होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
