Thursday, May 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्धव – राज हे दोन्ही भाऊ एकत्र येण्यावर शिवसेनेची साद आली तर पाहू – शर्मिला ठाकरे

पुणे : मनसेचे नेते राज ठाकरे व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परत एकत्र येणार का? असा प्रश्न सगळेजण विचारत आहे. त्यावर शिवसेनेची साद आली तर पाहू, अशी प्रतिक्रिया मनसेनेच्या नेत्या व राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

शर्मिला ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. तेव्हा त्यांनी मनसे शहर सघटक प्रल्हाद गवळी आयोजीत ‘गणपती आमचा किंमत तुमची २०२२’  उपक्रमाचे उद्घाटन केले. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला. यावेळी त्यांच्याबरोबर मनसेच्या नेत्या रिटा गुप्ता, बापू वासगावकर,मनसे शहर सघटक प्रल्हाद गवळी, मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेनेतून का बाहेर याचे उत्तर विविध पक्षातील पक्षाचे नेते विचारत असतात. त्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा आम्ही सगळे उत्तर दिली होते.

राज्यात शिंदे व फडणविस यांचे नवीन सरकार स्थापन झाले. त्यांनी महाविकास आघाडी सरकार मधल्या विविध प्रकल्पांना ब्रेक लावायला सुरुवात केली आहे. सरकारी नोकऱ्यांत पाच टक्के आरक्षण दिले जाईल, ही घोषणा आणि राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरातील महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे, असा आरोप एमपीएससी समन्वय समितीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या, लोकांना आश्वासन देण्यापेक्षा काम करायला हवं. आरक्षण देऊन नोकऱ्या देता येत नाहीत.

केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात विविध पक्षांनी सतत आंदोलन केले. त्यावरून राजकारण सुद्धा पेटले. त्यावर शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, महागाई वाढली हे दिसत नसेल तर मंत्री खासदार यांचे भते बंद करा. असा सल्ला शर्मिला ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला.

शिवसेनेचे व युवा नेते आदित्य ठाकरे सारखे शिंदे सरकारवर टीका करत असतात. बंडखोर आमदारांनी आम्हाला धोका दिला. सरकार जास्त काळ टिकणार नाही. त्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या, आदित्य ठाकरे संपलेल्या पक्षावर बोलत नाही.आता माझ तेच उत्तर आहे.निर्णय कोर्ट घेईल. असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading