Tuesday, May 5, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात उत्तर भारतातील राजस्थानी महिलांची कजरी तीज उत्साहात साजरी

पुणे: पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनाच्या प्राप्तीसाठी उत्तर भारतातील राजस्थानी महिलांच्या कजरी तीजला विशेष महत्त्व आहे पुण्यातील माहेश्वरी समाजाच्या वतीने या वर्षी १४ ऑगस्ट रोजी कोथरूड येथील सारडा परिवाराच्या घरी एकञित येत कजरी तीज उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सारिका समीर धूत,रूपाली सचिन धूत,ममता संदीप सारडा, पार्वती हनुमानदास सोनी,पूजा सारडा,राजश्री धूत
तसेच मुछाल परिवारीत सदस्य उपस्थित होते.
महेश्वरी समाजात कजरी तीजचे व्रत केले जाते.या व्रतामध्ये महिला दिवसभर निर्जल उपवास ठेवतात व नियमानुसार भगवान शिव, माता पार्वती आणि निमडी मातेची पूजा केली जाते स्रीया सोळा शृंगार करत संध्याकाळी चंद्र पाहून उपवास सोडला जातो.
उत्तर भारतातील प्रमुख असलेला कजरी तीज सण या वर्षी पुण्यात महेश्वरी समाजाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading