Saturday, May 9, 2026
BusinessLatest NewsTECHNOLOGY

‘वी’ ऍपवर महाराष्ट्र सार्वजनिक MPSC परीक्षांची तयारी करा

पुणे : देशभरात होणाऱ्या राष्ट्रीय  राज्य पातळीवरील विविध सरकारी परीक्षांची तयारी करून त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी भारतातील युवकांना सक्षम बनवण्यासाठी वी वचनबद्ध आहे. आपल्या ग्राहकांना उज्वल भवितव्याकडे झेप घेता यावी यासाठी त्यांच्या पंखांमध्ये बळ देण्यासाठी प्रयत्नशील असलेलीभारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वीने परीक्षाच्या सहयोगाने महाराष्ट्र सार्वजनिक सेवा आयोग (एमपीएससी) प्रिलिम परीक्षांच्या तयारीसाठी टेस्ट सीरिज साहित्य २१ ऑगस्ट २०२२पासून उपलब्ध करवून देण्याचे ठरवले आहे.

‘वी’ युजर्सना सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षांची तयारी करण्याची प्रक्रिया अगदी सुरळीतपणे करता यावी यासाठी ‘वी’ जॉब्स अँड एज्युकेशनमध्ये केंद्र/राज्य सरकारी नोकऱ्या मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ‘परीक्षा पास’ची एक महिन्याची सब्स्क्रिप्शन निःशुल्क देण्यात आली आहे. यामध्ये राज्य निवड आयोगबँकिंगशिक्षणसंरक्षणरेल्वे इत्यादी विविध विभागांमधील १५० पेक्षा जास्त परीक्षांच्या अमर्याद मॉक टेस्ट्सचा देखील समावेश आहे. ट्रायल कालावधी संपल्यानंतर युजर्स एका वर्षासाठी फक्त २४९ रुपये इतकी नाममात्र सब्स्क्रिप्शन फी भरून या प्लॅटफॉर्मवर आपला अभ्यास सुरु ठेवू शकतात.

‘वी’ ऍपवरील एमपीएसई टेस्ट सीरिजमध्ये भारतातील युवक भारतीय रेल्वेतील तब्बल १२००हून जास्त जागांसाठी तयारी करू शकतात. यामध्ये पोलीस उप निरीक्षकअसिस्टंट सेक्शन ऑफिसरस्टॅम्प इन्स्पेक्टर आणि राज्य कर निरीक्षक इत्यादींचा समावेश आहे. कुठेही असतानाकधीही ‘वी’ ऍपवर ‘वी’ जॉब्स अँड एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर ‘वी’ ग्राहक संशोधन करून तयार करण्यात आलेल्या टेस्ट मटेरियलचा लाभ घेऊ शकतात.

 

‘वी’ ऍपवर एमपीएससी टेस्ट साहित्य मिळवण्यासाठीचे टप्पे:

·         पहिली पायरी: तुमच्या ‘वी’ क्रमांकासह ‘वी’ ऍपवर लॉग इन करा.

·         दुसरी पायरी: ‘वी’ जॉब्स अँड एज्युकेशन’ पर्यायावर क्लिक करा.

·         तिसरी पायरी: ‘सरकारी नौकरी’ हा पर्याय निवडा.

·         चौथी पायरी: तुमचे प्रोफाईल तपशील भरा व एमपीएससी‘ हा पर्याय निवडा.

·         पाचवी पायरी: तेथील विषयांमधून तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडा.

 

‘वी’ ऍपवर ‘वी’ जॉब्स अँड एज्युकेशनमध्ये भारतातील सर्वात मोठा नोकरी शोध प्लॅटफॉर्म अपना‘, इंग्रजी शिकण्यासाठीचा आघाडीचा लर्निंग प्लॅटफॉर्म एनगुरू‘ आणि सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षांच्या तयारीसाठीचा प्लॅटफॉर्म परीक्षा‘ यांना एकीकृत करून घेण्यात आले आहे.   

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading