Saturday, May 9, 2026
BusinessLatest News

उद्याच्या भावी अभियंत्यांना H.O.P.E शिष्यवृत्ती देत शेफलर इंडिया करणार  सक्षम

पुणे  : अग्रगण्य औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह पुरवठादार शेफलर इंडिया लिमिटेड (BSE: 505790, NSE: SCHAEFFLER) ने आज तिच्या प्रमुख H.O.P.E अभियांत्रिकी शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीची घोषणा केली.

हा उपक्रम समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ७५,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत देईल जेणेकरून ते त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील आणि त्यांना उद्याचे आघाडीचे अभियंता बनण्यास सक्षम बनवू शकेल. हा कार्यक्रम Buddy4Study द्वारे राबविला जातो.

शेफलर इंडियाचे एचआर उपाध्यक्ष श्री.संतनू घोषाल म्हणाले, “एचओपीई शिष्यवृत्ती ही आमच्या सीएसआर कार्यक्रमाद्वारे सक्षमीकरणाला साध्य बनवणारा एक महत्त्वाचा कोनशिला उपक्रम आहे. आमचा विश्वास आहे की चाणाक्ष, तेजस्वी यक्तीमत्व चमकण्यास पात्र आहेत. त्यांना योग्य संधींसह सक्षम करणे व अधिक चांगले जीवनमान असलेल्या समाज आणि समुदाय निर्मितीसाठी चालना देण्याच्या आमच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. हे आमचे सलग ४ थे वर्ष असून आम्हाला या कार्यक्रमाचे चांगले परिणाम दिसत आहेत.”

शिष्यवृत्तीसाठीचे ऑनलाइन अर्ज १२ ऑगस्ट २०२२ ते १५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत करता येतील. पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबद्दल अधिक तपशीलांसाठी भेट द्या  Schaeffler India Hope Engineering Scholarship 2022-23  शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे निकाल ऑक्टोबर २०२२ मध्ये तात्पुरते जाहीर केले जातील.

HOPE बद्दल

HOPE हा शेफलर इंडियाचा प्रमुख CSR ब्रँड आहे ज्यात खालील क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. जसे की आरोग्य सेवा, रोजगारक्षमतेसाठी व्यावसायिक कौशल्य, राष्ट्रीय वारसा, कला आणि संस्कृतीचे जतन तसेच समाजाचे सक्षमीकरण. ‘अभियांत्रिकी शिष्यवृत्ती उपक्रम’, हा शिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या संस्थांचा एक भाग आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading