Sunday, April 5, 2026
BusinessLatest News

पेपरफ्रायने पुण्यामध्ये सुरु केला नवा स्टुडिओ

पुणे : फर्निचर व घरगुती वस्तूंची आघाडीची ईकॉमर्स कंपनी पेपरफ्रायने कंपनीच्या मालकीचे व कंपनीकडून चालवण्यात येत असलेले स्टुडिओ महाराष्ट्रात पुण्यामध्ये वाकड आणि ट्रायडेंटपुणे येथे सुरु केल्याची घोषणा केली आहे. हे पेपरफ्रायचे अनुक्रमे ५२ वे आणि ५७ वे स्टुडिओ आहेत.  भारतामध्ये घर आणि जीवनशैलीसाठी आवश्यक उत्पादनांच्या उद्योगक्षेत्रात विविध चॅनेल्समार्फत ग्राहकांच्या संपर्कात राहण्याच्या आणि हा संपर्क सातत्याने मजबूत करण्याच्या उद्देशाने कंपनी कार्यरत आहे. सध्या देशभरात ९० पेक्षा जास्त शहरांमध्ये १८० पेक्षा जास्त पेपरफ्राय स्टुडिओ आहेत.

पेपरफ्राय स्टुडिओने भारतात फर्निचर रिटेल क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. कंपनीच्या मालकीचे आणि कंपनीकडून चालवण्यात येणारे अर्थात कोको आणि फ्रँचायझीच्या मालकीचे व फ्रँचायझीकडून चालवण्यात येणारे अर्थात फोफो स्टुडिओंचा देशभरात विस्तार करणे हा कंपनीच्या ओम्नीचॅनेल धोरणातील प्रमुख भाग आहे.  वाकड आणि ट्रायडेंट येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या स्टुडिओंचे कार्पेट क्षेत्रफळ अनुक्रमे २६२५ चौरस फूट आणि ३६५५ चौरस फूट आहे. फर्निचर व घरगुती वापराच्या उत्पादनांच्या वैविध्यपूर्णविशाल कॅटलॉगचा प्रत्यक्ष अनुभव ग्राहक याठिकाणी घेऊ शकतात.  कंपनीच्या इंटेरियर डिझाईन सल्लागारांकडून डिझाईनसंदर्भात विशेष सल्ला मिळवण्याची सुविधा देखील ग्राहकांना याठिकाणी मिळते. पुण्यामध्ये सुरु करण्यात आलेल्या नव्या स्टुडिओंमध्ये महाराष्ट्रातील ग्राहकांच्या घर आणि जीवनशैलीशी संबंधित गरजा व आवडीनिवडींना अनुसरूनत्यांना व्यक्तिगत खरेदीचा अनोखा अनुभव देण्याच्या उद्देशाने उत्पादनेसेवासुविधा उपलब्ध करवून देण्यात आल्या आहेत.

पेपरफ्रायने आपला पहिला कोको अर्थात कंपनीच्या मालकीचा आणि कंपनीकडून चालवण्यात येणारा स्टुडिओ २०१४ साली सुरु केला. विविध चॅनेल्समार्फत उत्पादनेसेवासुविधा उपलब्ध करवून देण्याच्या आपल्या क्षमतांमध्ये वाढ करावीफर्निचर विकत घेण्यापूर्वी ते प्रत्यक्ष पाहता यावेत्याला हात लावता यावा ही ग्राहकांची इच्छा पूर्ण करावी यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले. भारतीय ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाची डिझायनर उत्पादने मिळावीत या उद्देशाने हे स्टुडिओ सुरु करण्यात आले. पेपरफ्रायच्या इन-हाऊस डिझाईन तज्ञांकडून ग्राहकांना निःशुल्क सल्ला मिळवता यावा हा कोको स्टुडिओ सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading