fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

दीपक केसरकरांनी पर्यटनमंत्री व्हावे – संभाजीराजे छत्रपती

पुणे : शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी आज खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट घेतली. उदयराजेंच्या भेटीनंतर त्यांनी माजी खासदार संभाजीराजे यांचीही भेट घेतली. दोघांची भेट झाल्यानंतर दोघांनी प्रसार माध्यमाची संवाद साधला. यावेळी ‘दीपक केसरकर यांनी पर्यटनमंत्री व्हावे, असा आमचा आग्रह आहे’, असे खासदार संभाजी राजे  म्हणाले. 

दीपक केसरकर म्हणाले, उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मला पर्यटन स्थळांबाबत मार्गदर्शन केले आहे. मी पर्यटन मंत्री होवो किंवा न होवो. पण आपल्या गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राज्यात झालेले मराठा आंदोलन पेटणार होते. पण त्यावेळी संभाजीराजेंच्या एका शब्दांवर मराठा आरक्षण आंदोलन मागे घेतले गेले. संभाजी राजेंच्या एका शब्दामुळे ते घडले, मी पाहिलेय. मराठा क्रांती मोर्चावेळी आंदोलकांच्या व्यासपीठावर जाण्याची ताकद त्यांच्यातच होती. ते काय स्वत:साठी लढत नाहीत, तर या लोकांसाठी लढत आहेत. त्यांच्या पूर्वजांनी खूप लढाया लढल्या आहेत. विचारांची ताकद, प्रगल्भता शाहू महाराजांकडून मिळाली आहे, असेही केसरकर म्हणाले.

दीपक केसरकर म्हणाले,संभाजीराजे राज्यभर दौरे करत आहेत. किल्ल्यांचे संवर्धन करत आहेत. महाराष्ट्राचे जे वैभव आहे ते जगासमोर आले पाहिजे. जयपूरमध्ये पिंक स्टोन आणि कोल्हापूरमध्ये ब्लॅक स्टोन आहे, एवढाच फरक आहे. इतिहास जपला तर इंग्लंड, फ्रान्ससारखे होईल. जे कोणी राज्याचे पर्यटन मंत्री होतील. मी स्वत: पर्यटन मंत्र्यांकडे संभाजीराजेंसोबत जाईन हे जर पर्यटन झाले.तर हजारो लोकांना रोजगार मिळतील. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading