fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात आयुक्त विक्रम कुमार यांचे महिला रुग्णांनी केले औक्षण

पुणे – पुणे महापालिकेच्यावतीने येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय आवारातील विविध उपक्रमांसाठी सीएसआर च्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली. त्यासोबतच शासनाने मान्यता दिल्यास पुणे महापालिकेच्या वतीने मनोरुग्णालयाच्या आवारातील इतर भौतिक सोयीसुविधा व उपाययोजनांसाठी संयुक्त प्रकल्प राबविण्यासाठी देखील सहकार्य करू असे आश्वासन विक्रम कुमार यांनी यावेळी दिले. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त विक्रमकुमार बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भाजपचे प्रवक्ते मंगेश गोळे, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. लता पांढरे कार्यक्रमाचे संयोजक गणेश बाबर यांच्यासह रिज़वाना शेख, माहमूद खान,चंद्रकांत जंजीरे,शशिकांत कुलकर्णी, किसन बाबर, सुभाष चव्हाण, महमूद खान, फहीम शेख,राहुल जाधव, सागर कांबळे, हुसैन तांबोळी, मुश्ताक शेख,जगन ठोम्बरे,कृष्णा सदभैया,रज़्ज़ाक सय्यद,प्रीति भट्टी,शामा जाधव, श्वेता पवार यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा तसेच आवारातील जुन्या व जीर्ण इमारती, सार्वजनिक स्वच्छता, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन अशा आवश्यक बाबींसाठी पुणे महापालिकेच्या वतीने योग्य ती मदत केली जाईल. इतर आवश्यक बाबींसाठी सी एस आर च्या माध्यमातून निधी उभारून मनोरुग्णालय प्रशासनाच्या आवारातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी आयुक्त तसेच उपस्थित मान्यवरांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महापालिका आयुक्त विक्रम कुमार देखील काही वेळ भाऊक झाले होते. मनोरुग्णालय आवारातील परिसराची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली. तसेच आवश्यक त्या सोयी सुविधा तातडीने रद्द करणे बाबतच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
सूत्र संचालन व आभार अज़हर खान यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading