पुणे लोणावळा मार्गावरील लोकलसेवा २२ ऑगस्ट पासुन पूर्ववत होणार
पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या लोकल पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार १५ ऑगस्टपासून सहा लोकल फेऱ्या तर २२ ऑगस्टपासून चार लोकल फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येतील, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्ये रेल्वे ने लोकल गाड्या बंद केले होते. जसे जसे कोरोनाचे प्रादुर्भाव कमी झाला तसतश्या लोकल सुरू झाल्या. मात्र त्या चाकरमान्यांसाठी पुरेशया नव्हत्या. यामुळे अनेक रेल्वे प्रवाश्यांनी रेल्वेकडे तक्रारी ही केल्या. याची दखल घेवून पुणे लोणावळा मार्गावरील सर्व लोकल सेवा २२ ऑगस्टपर्यंत पूर्ववत होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळवले आहे. त्यानुसार येत्या १५ ऑगस्टपासून सहा लोकल फेऱ्या तर २२ ऑगस्टपासून चार लोकल फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येतील, असे मध्य रेल्वे विभागाने कळविले आहे.
आठ ऑगस्टपासून सुरू झालेल्या लोकल फेऱ्या
- पुणे- तळेगाव लोकल ही पुण्याहून दुपारी ३:४२ वा. रवाना होऊन तळेगावला ४:३२ वाजता पोहोचेल.
- पुणे-लोणावळा लोकल ही रात्री ९:०२ वाजता रवाना होऊन रात्री १०:२२ वा.लोणावळ्याला पोहोचेल.
- तळेगाव-पुणे लोकल ही दुपारी ४:४० वा तळेगावहून रवाना होऊन पुण्याला संध्याकाळी ५:३२ वा. पोहोचेल.
१५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या लोकल फेऱ्या
- पुणे-लोणावळा लोकल ही रात्री १०:१० वाजता रवाना होऊन रात्री ११:३० वा लोणावळ्याला पोहोचेल.
- पुणे-लोणावळा लोकल ही पहाटे ४:४५ वा पुण्याहून रवाना होऊन सकाळी ६:०५ वा पुण्याला पोहोचेल.
- लोणावळा – पुणे लोकल ही सकाळी ५:२० वा लोणावळ्याहून रवाना होईल व सकाळी ६:४० वा. पुण्याला पोहोचेल.
- लोणावळा – पुणे लोकल लोणावळ्याहून रात्री १०.३५ वा होईल व पुण्याला रात्री ११:५० वा. पोहोचेल.
- लोणावळा – पुणे लोकल ही लोणावळ्याहून रात्री ११:४० वा रवाना होईल व दुसऱ्या दिवशी रात्री १:१७ वा पुण्याला पोहोचेल.
२२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या लोकल फेऱ्या :
- पुणे- तळेगाव लोकल ही पुण्याहून रात्री ११:२० वा रवाना होईल व दुसऱ्या दिवशी १२:१० वा तळेगावला पोहोचेल.
- पुणे-लोणावळा लोकल ही पुण्याहून सकाळी ६:४८ वा रवाना होईल व तळेगावला ७:३८ वा पोहोचेल.
- तळेगाव – पुणे लोकल ही तळेगावहून रात्री १२:३५ वा. रवाना होईल व पहाटे १:३७ वा पुण्याला पोहोचेल.