कोथरुड ग्रामस्थांच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा सत्कार
पुणे:भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची नुकतीच राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाली. त्याबद्दल कोथरूड ग्रामस्थांच्या वतीने माननीय मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नामदार पाटील यांचे कोथरूडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी नानासाहेब भेलके, बाळासाहेब मोकाटे, निरोध्दीन पटेल रामभाऊ माथवड, विलास बोडके, शंकर मोकाटे, सुनील बरके, हरिभाऊ कुंबरे, महादेव वांभिरे उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राज्याच्या मंत्रीपदी नुकतीच निवड झाली. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांचे कोथरूड मध्ये आगमन झाले. यावेळी त्यांनी सर्वप्रथम कोथरूडचे ग्रामदैवत म्हातोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच म्हातोबाची मनोभावे पूजा केली. यानंतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने माननीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर नामदार पाटील यांचे कोथरुडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी श्री. पाटील यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्त्री शिक्षणाचे जनक महर्षी कर्वे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.