fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : सरकारने स्वतःच्या करोडोंच्या जाहीरातीं ऐवजी संविधान छापून त्याचा गौरव करावा

पुणे : ‘भारतीय स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करतांना, राज्यातील सत्ताधारी भाजप नागरी कररूपी पैशातुन करोडोंच्या जाहिराती करीत आहे… त्या शासकीय जाहीरातींमध्ये, “स्वातंत्र्याचे जन-नायकांचे, महात्मा गांधींसह प्रमुख स्वातंत्र्य सेनानींचे फोटो; राष्ट्रीय तिरंगा ध्वजाची संहिता, तिन्ही रंगांचा मतिथार्त व संविधान (प्रीअँबल) छापून” त्यांचा कृतज्ञता’पर, गौरवपर विशेष उल्लेख करण्याची मागणी ‘राजीव गांधी स्मारक समिती व Knowing Gandhi, Pune (गांधी जाणूयात)’ तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

सत्ताधारी भाजपनेते ‘करोडोंच्या नागरी पैशातून’ “स्वतःचेच् फोटो” झळकावून घेण्याची हौस पुरी करत आहे. हा प्रकारच मुळी संकुचित व आत्मकेंद्रीत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित केंद्र सरकारने स्वातंत्र्य संग्रामाच्या केंद्रीय माहीती व नभोवाणी विभागा कडील पुर्वी दाखवल्या जात असलेल्या चित्रपीती दाखवून ऐतिहासिक स्मृतींना सुवर्ण झळाळी देण्याचे कार्य देखील सत्ताधार्यांनी करावे, अशी मागणी देखील दोन्ही संस्थांच्या वतीने आयोजीत पत्रकार परीषदेत करण्यात आली.  या प्रसंगी राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, जेष्ठ सदस्य पुणे शहर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष थोरवे, ‘गांधी जाणुयात’चे संस्थापक अध्यक्ष संकेत मुनोत, भाऊ शेडगे, संजय मानकर, संजय अभंग, महेश अंबिके, शंकर शिर्के, अशोक काळे, उदय लेले इ. उपस्थित होते.

‘हर घर तिरंगा’ अभियान राबवतांना तिरंगा ध्वजाचा मतिथार्त देखील सत्ताधाऱ्यांनी समजून घेणे गरजेचे असुन, तिरंगा हा खादी व स्वदेशी कापडाचा असावा, अशीच त्यामागील धारणा व सरकारी धोरण होते. मात्र मोदी सरकारने चिन या (शत्रू राष्ट्रा) कडून करोडोंचा महसूल देऊन; पॅालीस्टर झेंडे घेण्याचा घातलेला घाट निंदनीय आहे.  ज़र अमृत महोत्सव निश्चित होता, तर स्वदेशी कापडातून देखील ‘देशांतर्गत तिरंगा ध्वजांचे ऊत्पादन केंद्रातील सरकारला शक्य झाले असते’ व शासकीय पैशांचा चुराडा होऊन देखील, आज येणारे “निकृष्ट झेंडे खरेदी करण्याची वेळ व नामुष्की प्रशासनावर आली नसती” असे ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी सांगीतलें.

राज्यातील भाजप नेते पंतप्रधान मोदी यांना खुश करण्यासाठी बेताल विधाने करीत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारीने बोलावे, असे विधान काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी केले. देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्या प्रमाणे जर ‘भारताने चीनला प्रत्यक्ष धुसखोरी करू न देतां’ उलट पटीने अनेक पट त्यांचेच चीनी सैन्य मारले (?) असल्यास ते कसे व केंव्हा मारले हे आपल्या देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्र्यांना पटवून द्यावे, अशी मागणी देखील प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading