जागतिक शांतता व महीला सबलीकरणासाठी पुण्यात मॅरेथॉन– बॅरोनेस पॅट्रिशिया
पुणे – कॉमनवेल्थ गेम आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की)महीला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात रेस कोर्स येथे५ फेब्रुवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे. जागतिक शांतता व महिला सबलीकरणासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा
कॉमनवेल्थ गेमच्या सरचिटणीस बॅरोनेस पॅट्रिशिया
यांनी केली. यावेळी फिक्कीच्या अध्यक्ष नीलम सेवलेकर उपस्थित होत्या. फिक्कीच्या वतीने आयोजित उद्योजिका परिषदे मध्ये त्या बोलत होत्या .
जागतिक स्तरावर २०२३ हे वर्ष कॉमन वेल्थने ‘शांती वर्ष’ म्हणून घोषित केले आहे.56 देशांचा समावेश असलेल्या कॉमनवेल्थ राष्ट्रांसह ही मॅरेथॉन स्पर्धा जागतिक शांतता वाढवण्याच्या उद्देशाने असेल. या स्पर्धेला ‘शांततेसाठी धाव’ असे म्हटले जाईल असे पॅट्रिशिया यांनी सांगितले.
ही 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन स्पर्धा असणार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरील नोंदणीतून अशी ही स्पर्धा असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. महिला उन्नतीसाठी विविध सामाजिक प्रकल्प राबवून जागरूकता निर्माण करणे हा या मॅरेथॉन स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांबरोबरच सुमारे १५०० स्पर्धक सहभागी होतील अशी माहिती पॅट्रिशिया यांनी दिली.
फिक्की आशिया खंडातील महिलांचे मोठे व्यासपीठ आहे. संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून देशभरात विविध राज्यांमध्ये 19 शाखा आहेत .या संस्थेच्या माध्यमातून सुमारे आठ हजाराहून अधिक महिला उद्योजक आणि व्यावसायिक महिला सबलीकरणासाठी काम करत आहे आहेत. पुण्यात आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सपर्धेचे आयोजन करण्याची संधी संस्थेला मिळाली आहे असे नीलम सेवलेकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन फिक्की महिला आघाडीच्या अध्यक्षा नीलम शेवलेकर यांनी केले होते .यावेळी सचिव सोनिया राव,करीना शेवानी, निशिता मंत्री , पिंकी राजपाल ,अनिता अग्रवाल आणि पुणे शहरातील फिक्की महिला पदाधिकारी आणि महिला उद्योजक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
-बॅरेनेस पॅट्रिसिया या परिषदेस अस्सल मराठी साडीच्या पेहरावात उपस्थित राहून पुणेकर महिला उद्योजिका यांची मने जिंकली .तसेच महाराष्ट्रीयन साडी आवडल्याची त्यांनी यावेळी सांगितले
