fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

संततधार पावसामुळे खडकवासला प्रकल्पांत २६.५१ टीएमसी पाणी

पुणे: खडकवासला प्रकल्पांतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने संततधारध पाऊस सुरु असल्याने या प्रकल्पातील एकूण पाणीसाठा हा आजखेरपर्यंत २६.५१ टीएमसी झाला आहे.
या प्रकल्पातील चारही धरणे पूर्ण भरण्यास आणखी २.६४ टीएमसी पाणी कमी आहे.
दरम्यान, गतवर्षी याच दिवशीच्या एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा १.४२ टीएमसी इतका कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी याच तारखेला एकूण २७.९३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.
मागच्या वर्षी याच दिवशीच्या एकूण
पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांतील मिळून एकूण पाणी साठवण क्षमता ही २९.१५ टीएमसी इतकी आहे. एकूण पाणीसाठ्यापैकी पुणे शहराला पिण्यासाठी एका वर्षात सुमारे १५ टीएमसी पाणी लागत असते.
खडकवासला प्रकल्पात खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही चार धरणे येतात.

धरणनिहाय एकूण पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • खडकवासला —- १.९७
  • पानशेत —- १०.६५
  • वरसगाव —- १२.८२
  • टेमघर —- ३.७१
  • एकूण —- २९.१५

धरणनिहाय ११ ऑगस्टचा (यंदाचा) पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • खडकवासला — १.४८
  • पानशेत — १०.६५
  • वरसगाव — ११.६२
  • टेमघर — २.७६
  • एकूण पाणीसाठा —- २६.५१

धरणनिहाय गतवर्षीचा याच तारखेचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • खडकवासला —- १.७२
  • पानशेत —- १०.६५
  • वरसगाव —- १२.३९
  • टेमघर —- ३.१७
    : एकूण पाणीसाठा —– २७.९३

गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा स्थिती

  • चारही धरणांतील एकूण साठा — २६.५१
  • गेल्या वर्षीचा या तारखेचा साठा — २७.९३
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा एकूण पाणीसाठा — १.४२ टीएमसीने कमी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading