Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एनडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

मुंबई : राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. येत्या 11 ऑगस्ट पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्यात रेड व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१,राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १२ तुकड्या तैनात आहेत. नांदेड- १, गडचिरोली- १ अशा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ)  एकूण दोन तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading