Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘सुपरफास्ट’; महिनाभरात ३९९ फाईल्सचा निपटारा

मुंबई : महाविकास आघाडी सारकर गेल्यापासून दोन जणांचे मंत्रीमंडळ म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. आता उद्या (दी. 9 ऑगस्ट) मंत्रीमंडळ विकास होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून महिन्याभरात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची माहिती देण्यात आली आहे. जवळपास महिन्याभराच्या या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ३९९ फाईल्सचा निपटारा केल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्य सरकार कडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलै ते अगदी आतापर्यंत म्हणजे 8 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 399 फाईल्सचा निपटारा केला आहे. विशेष म्हणजे यात नैसर्गिक आपत्तीमधील मदत, गरजूंना मदत, कृषि विभाग, मंत्रिमंडळासमोर आणावयाचे प्रस्ताव, फाईल्स, विविध नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागाच्या फाईल्सचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत विविध विभागांच्या सचिवांना सर्वसामान्यांची तसेच जनहिताची कामे गतिमान रितीने झाली पाहिजेत तसेच लोकांची कामे अडणार नाहीत हे पाहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जनहितासाठी तत्परतेने निर्णय घेण्यात येत आहेत, असे कळवण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading