Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – कात्रज मध्ये पुन्हा शिंदे ठाकरे गट आमने सामने येणार

पुणे:माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर तीन दिवसापूर्वी पुण्यातील कात्रज चौकात ठाकरे गटातील शिवसैनिकांकडून प्राणघातक हल्ला झाला होता. त्याच चौकात जाहीर सभा घेऊन ठाकरे गटाला चोख उत्तर सामंत देणार असल्याची माहिती पुण्यातील शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
यामुळे येत्या काही दिवसात कात्रजमथ्ये पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने येणार असल्याचं दिसते.
शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची मागची काच फुटली. याबाबत सामंत यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही कारवाई करत आरोपींना अटक केली. मात्र, हा हल्ला पूर्वनियोजित आणि सुपारी देऊन करण्यात आल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे. शिंदे गटाकडून आता सामंतांवर झालेल्या हल्लाला प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. ज्या कात्रज चौकात सामंत यांच्यावर हल्ला झाला, तिथेच सामंत यांची जाहीर सभा घेतली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सामंत यांच्यावर ज्या कात्रज चौकात हल्ला झाला. त्याच ठिकाणी आता सामंतांची जाहीर सभा घेतली जाणार आहे. जाहीर सभेच्या माध्यमातून सामंत या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार आहेत. शिंदे गटाचे पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी तशी माहिती दिलीय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading