शिंदेना दिल्ली समोर झुकाव लागतंय; याच दुःख वाटतंय – जयंत पाटील
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्लीत निती आयोगाची सातवी बैठक आज पार पडली. नीती आयोगाची ही बैठक नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात पार पडली. बैठकीतील एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. निती आयोगाच्या बैठकीचा एक फोटो समोर आलाय. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटच्या रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरुन विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली त्यावर बघा ना. औरंगाजेबा समोर शिवाजी महाराज दुसऱ्या रांगेत उभे केले त्यावेळी त्यानी सभा सोडून दिली.आता किती बदल झाला आहे.किती झुकाव लागतंय. दिल्लीचा दरबार मोदींचा आहे. मात्र याच दुःख वाटतंय. असा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १६ ते १८ ऑगस्टदरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात गाठीभेटी घेणार आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला व भोर या विधानसभा मतदारसंघांना भेटी देऊन त्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजप बाजी मारणार का अशा चर्चा चालू झाल्या आहेत. त्यावर जयंत पाटील म्हणाले,अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीत पवारांनी जे काम केलं ते बघण्यासाठी येत आहेत. असे जयंत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धोका देऊन भाजप बरोबर युती करून मुख्यमंत्री झाले .त्यावर जयंत पाटील म्हणाले,एकनाथ शिंदे एवढी लांब उडी मारली आहे कुणाची विचारधारा बदलले सांगता येत नाही.एकनाथ शिंदे हे माझ्या शेजारी बसायचे त्याना कधी वाटलं नाही .ते मुख्यमंत्री व्हायची, त्यांचा स्वभाव चांगला आहे. मात्र आता त्यानी जे केलं ते योग्य नाही केलं. या नवीन सरकार बद्दल काही जनता नाराज आहे. काही जनता खुश आहे. जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील म्हणाले.सरकारबद्दल आता नाराजी आहे. निवडणुका घाव्यात म्हणजे नेमकं समजेल आवाहन जयंत पाटील यांनी शिंदे सरकारला केले.
शिंदे गटातील आमदार परत उद्धव ठाकरे बरोबर येतील .का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यावर जयंत पाटील म्हणाले,सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यावर सर्वच्या सर्व 40 आमदार उद्धव ठाकरेना जाऊन भेटतील .त्यांना दुसरा पर्याय नाही.असे जयंत पाटील म्हणाले.
