fbpx

नुपूर शर्माच समर्थन केल्याने तरूणावर प्राणघातक हल्ला; अहमदनगर हादरलं

मुंबई : नुपूर शर्माच समर्थन केल्याने अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच काल अहमदनगर येथील कर्जतमध्ये याच कारणावरून एका तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेवून या प्रकणाचा खुलासा केला. प्रतीक पवार असे या तरुणांचे नाव असून सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. दारम्या, भाजपाने कधीही नुपूर शर्माचं सर्मथन केलेल नाही, परंतु त्यावरून जे कोणी हिंदूंवर हल्ला करत असेल तर हिंदू पण त्याला जशास तसे उत्तर देतील, असा इशारा या नितेश राणे यांनी दिला आहे.

राणे म्हणाले, नुपूर शर्माचा डीपी ठेवला म्हणून कर्जतमधील प्रतिक पवार या तरुणाला 04 ऑगस्ट रोजी मारहाण करण्यात आली आहे. प्रतिक पवार या तरुणावर सध्या उपचार सुरु असून त्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे. उदयपूर आणि अमरावतीतील हत्येच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये हा हत्येचा प्रयत्न करण्यात आला असून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी आम्ही करीत आहोत.

दरम्यान, उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. त्याप्रमाणेच याही प्रकरणाचा तपास NIA ने करावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

नेमकी घटना काय आहे?

अहमदनगर कर्जत येथील प्रतीक पवार या तरुणाने नूपुर शर्मा यांचा फोटो डीपी म्हणून लावला होता. या कारणास्तव आणणा भाऊ साठे यांच्या जयंती दिवशी कार्यक्रमाला जात असताना काही लोकांनी त्याला आडवून याबाबद जाब विचारला. अन् मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी मारेकऱ्यांजवळ लोखंडी गज व लाकडी काठ्या अशी हत्यारं असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात प्रतीक बेशुद्ध होवून खाली पडला. मारेकऱ्यांना वाटले त्याचा मृत्यू झाला व त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर इतर ग्रामस्थांनी प्रतिकला रुग्णालयात दाखल केले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: