fbpx

गोंदिया जिल्हात ‘निर्भया’ घटनेची पुनरावृत्ती; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

मदतीच्या बहाण्याने महिलेवर पाशवी बलात्कार; पिडीता गंभीर  

भंडारा : राज्यातील गोंदिया जिल्हात महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. येथे ‘निर्भया’ घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मदतीच्या बहाण्याने एका ३५ वर्षीय महिलेवर चार जणांनी दोन वेगवेगळया ठिकाणी नेऊन पाशवी अत्याचार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर या पीडितेच्या गुप्तांगांवरही वार केले आहेत. या प्रकरणातील पिडीतेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहे. गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्यानं भंडारा पोलिसांनी संबंधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसाकडे वर्ग केला आहे.

नेमकी घटना काय आहे? 

पीडित महिला पतीपासून विभक्त झालेली महिला आहे. ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. दरम्यान, 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्यानं तिने रात्रीच्या सुमारास घर सोडल आणि ती गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्यासाठी निघाली. यावेळी रस्त्यावर गाडीच्या शोधात उभ्या असलेल्या या महिलेला एका कार्य चालकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. पण या नराधमानं तिला घरी न सोडता गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 31 जुलैला पळसगाव जंगलात नेऊन या महिलेवर पुन्हा अत्याचार केला. अन् त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीने पळ काढला.

पिडीत महिला यातूनही सावरून कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे (दी. १ ऑगस्ट) दुचाकी दुरुस्त करणाऱ्या इसमाने आणखी एकाला सोबत घेवून तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं पीडितेवर पाशवी अत्याचार केले. व तिच्या गुप्तांगांवरही वार केले. तर (दी. २ ऑगस्ट) त्यानंतर पीडितेला कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती. पहाटे गावकऱ्यांनी पीडितेला पाहिलं. त्यानंतर पोलिसांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला दाखल केलं. वैद्यकीय तपासणीत महिलेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: