fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsLIFESTYLE

 सिंगापूर टुरिझम बोर्डातर्फे पुण्यात ट्रॅव्हल ट्रेड रोड शो चे आयोजन

पुणे : आंतरराष्ट्रीय पर्यटनाला वेग आला असताना सिंगापूर टुरिझम बोर्डाने (STB) आज पुण्यात डीपनिंग कनेक्शन्स, अचिव्हिंग टुगेदर या ट्रॅव्हल ट्रेड रोड शो चे आयोजन केले होते. पाच शहरांच्या रोड शो मालिकेचा एक भाग म्हणून एसटीबी भारतातील व्यापार भागीदार-मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्याशी संलग्न होण्यासाठी ४० सिंगापूर पर्यटन भागधारकांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे शिष्टमंडळ घेऊन आले आहे.

या व्यापार सहभाग कार्यक्रमात १८० हून अधिक पुणेस्थित ट्रॅव्हल एजंट्स उपस्थित होते.  सिंगापूर पर्यटनाची मजबूत भागीदारी अधिक सखोल करण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारक आणि स्थानिक प्रवासी व्यापार यांच्यात नवीन नेटवर्क वाढवायला चालना मिळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोमध्ये सिंगापूरमधील काही प्रमुख आकर्षणे, हॉटेल्स, टूर ऑपरेटर, क्रूझ लाइन आणि डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपन्या (DMCs) यांची एक मजबूत आखणी दिसली. सिंगापूरला भेट देणाऱ्या भारतीय प्रवाशांची संख्या परत वाढविण्यासाठी सिंगापूर पर्यटन व्यापार आणि पुणे ट्रॅव्हल एजंट्स या दोघांनी आपापल्या बाजूने बांधिलकी दर्शविली. कोविड पूर्व काळात हे शहर भारतीय प्रवाशांसाठी एक पसंतीचे ठिकाण होते आणि आता पर्यटन पुन्हा सुरू झाल्याने ते पुन्हा एक आवडते ठिकाण बनले आहे.

लसीकरण केलेल्या प्रवास चौकटी (VTF) अंतर्गत सिंगापूर १ एप्रिल २०२२ पासून संपूर्ण लसीकरण झालेल्या अभ्यागतांसाठी विलगीकरण मुक्त प्रवासासाठी खुले झाले असून कोणत्याही चाचणी किंवा विलगीकरणाची आवश्यकता नाही. तेव्हापासून देशात २०२२ च्या पहिल्या सहामाहीत १.५  दशलक्ष हून अधिक पर्यटक येऊन गेले.  २०२१ मध्ये याच कालावधीत येऊन गेलेल्या पर्यटकांच्या संख्येपेक्षा हे प्रमाण १२ पट जास्त आहे. भारत सिंगापूरची दुसरी सर्वात मोठी स्त्रोत बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. भारतातून वर्षाच्या केवळ पहिल्या सहामाहीत २१९,००० हून अधिक भारतीय पर्यटकांचे आगमन झाले आहे. पर्यटन क्षेत्र सावरत असल्याचे हे एक स्थिर आणि आशावादी मार्ग सूचक आहे.

महामारी पासून सिंगापूर पर्यटन भागधारकांसह एसटीबीचा हा पहिला बहुविध शहरांतील रोड शो असल्यामुळे हा रोड शो वर्षाच्या सुरुवातीला एसटीबीच्या व्यापार पोहोचवण्याच्या प्रयत्नांवर आधारित आहे.  एप्रिल २०२२ मध्ये SATTE 2022 (दिल्ली-NCR), OTM 2022 (मुंबई) आणि बहु-शहर उत्पादन अपडेट सत्रे यात समाविष्ट आहेत. सिंगापूर टुरिझम बोर्ड आणि शिष्टमंडळाने कोविड डाउनटाइमच्या गेल्या दोन वर्षांनंतर सुरू केलेल्या शहराच्या नवीन आणि पुनर्कल्पित योजना सादर केल्या.

यामध्ये गुंगवून टाकणारे आणि अत्यंत इंस्टाग्रामेबल म्युझियम ऑफ आइस्क्रीम आणि स्कायहेलिक्स सेंटोसा, सिंगापूरचे पहिले ओपन-एअर पॅनोरामिक आकर्षण आहे. तिथून पर्यटकांना सेंटोसा आणि दक्षिणी वॉटरफ्रंटची निसर्गरम्य दृश्ये बघता येतात. या नवीन सादरीकरणाच्या  गतीला जोडून आगामी महिन्यात सिंगापूरमध्ये ब्लॉकबस्टर अनुभवांची एक अ‍ॅक्शन-पॅक आखणी देखील आहे. त्यामध्ये क्लाउड फॉरेस्टमध्ये गार्डन्स बाय द बे च्या संवादात्मक अवतार अनुभवाचा समावेश आहे. २००९ च्या गाजलेल्या साय-फाय चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित सिक्वेलवर आधारित, मोहवून टाकणारे आकर्षण पाहुण्यांना पॅंडोराच्या परकीय जगाशी, त्यातील बायोल्युमिनेसेंट वातावरण, गूढ प्राणी, वनस्पती आणि तेथील स्थानिक लोकांच्या मनमोहक संस्कृती, नावीशी जोडण्यासाठी आमंत्रित करते.

भारतीय क्रूझ हॉलिडे निर्मात्यांसाठी आता शेजारच्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय पोर्ट कॉल्ससह अधिक क्रूझिंग पर्याय उपलब्ध आहेत. ते रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलचे क्वांटम-अल्ट्रा क्लास जहाज, स्पेक्ट्रम ऑफ द सीज किंवा रिसॉर्ट्स वर्ल्ड क्रूझच्या जेंटिंग ड्रीम जहाजावरील अत्युत्तम क्रूझ साहसाचा आनंद घेऊ शकतात. २०१९ मध्ये भारत हे सिंगापूरचे सर्वोच्च स्त्रोत बाजारपेठ होती. एमआयसीई आघाडीवर एसटीबी आकर्षक समूह प्रवास योजना सादर करते. त्यामुळे कॉर्पोरेट्सना जेवणातील नवीन अनुभव आणि थीमॅटिक टूर्स आणि टीम बिल्डिंग अॅक्टिव्हिटीजच्या आकर्षणाचा आनंद घेता येतो.

सावरत असलेले पर्यटन क्षेत्र आणि रोड शोबद्दल बोलताना सिंगापूर पर्यटन मंडळ भारत, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाचे क्षेत्र संचालक श्री रेन्जी वोंग म्हणाले, “दोन वर्षांहून अधिक काळानंतर सिंगापूरमध्ये चांगल्या संख्येने येणाऱ्या भारतीय प्रवाशांचे स्वागत करताना आणि त्यांना परिचित अशा आवडीच्या आणि आमच्या नवीन, पुनर्कल्पित अनुभवांची मजा लुटताना बघण्यात आम्हाला आनंद होत आहे. सिंगापूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने पुणे हे एक महत्त्वाचे स्त्रोत शहर राहिले आहे. या रोड शोद्वारे आमच्या प्रेक्षकांना सिंगापूर आता खुले झाले आहे हा संदेश देत आणि त्यांची सुट्टी संस्मरणीय करण्यासाठी आम्ही त्यांच्या स्वागताला सज्ज रहात विकासाची गती सुरू ठेवण्याचे आमचे ध्येय आहे. पुण्यातील आमच्या भागीदार-मित्रांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करताना आणि त्यांच्या ग्राहकांना सिंगापूरमध्ये येण्याचे आमंत्रण देताना आम्हाला आनंद झाला आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading