गाजलेल्या कव्वालीच्या उत्साहपूर्ण सादरीकरणाने रंगला ‘सुफी दरबार’
कार्यक्रमाची सुरुवात निर्गुण निराकार रुप असणाऱ्या ईश्वराचे गुणगान करणाऱ्या ‘अल्ला हू अल्ला हू’ या कव्वाली ने झाली. त्यानंतर सादर झालेल्या ‘फर्श से लेकर अर्श को जाना सब के बस की बात नही’ या कव्वालीने मैफिलीत रंगत आणली. मोहम्मद पैंगबंर यांचे जिवन कसे जगावे हे तत्व या कव्वालीतून सांगण्यात आले. कव्वाली गायक पवन नाईक यांचा दमदार आवाज आणि वादकांची तितकीच सुंदर साथ यामुळे मैफिलीला चार चांद लागले. प्रेक्षकांनी देखील कलाकारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कव्वाल बानीचे ख्याल, मनकबत, ह्मद, नात, मरसिया काफी यांची माहिती यावेळी गायक पवन नाईक यांनी दिली.
प्रवीण कासलीकर, कल्याण मुरकुटे (संवादिनी), कुलदीप चव्हाण (बुलबुलतरंग), शेखर दरवडे (तबला), विजय जाधव, निनाद पारखी, रिजवान शेख, मुलांशू परदेशी, श्रेयस शिंत्रे, पवन तळेकर, नवरतन वर्मा (सहगायन) यांनी साथसंगत केली.