fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘साजिंदे’ वेबसिरीज घेणार रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव

दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंच्या प्रत्येक सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो. बाईतल बाईपण प्रभावीपणे मांडणार संवेदनशील मन हे फार कमी पुरुषांकडे असत त्यापैकी एक म्हणजे गजेंद्र अहिरे होय. दर्जेदार चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर गजेंद्र अहिरेंनी मोर्चा वळवला आहे तो वेबसिरीजकडे.  चित्रपटाच्या कथेला प्राधान्य मिळवून देण्यासाठी जी धडपड त्यांची असते तीच धडपड एक कथानक वेबसिरीजमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यास गजेंद्र अहिरेंनी प्रयत्न केले आणि ‘साजिंदे’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणली. ‘व्हीमास मराठी’ प्रस्तुत दिदर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘साजिंदे’ ही रोमँटिक वेबसिरीज ‘व्हीमास मराठी’ या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘व्हीमास मराठी’च्या ‘राडा राडा’ या टॉक शो मधून प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे झळकली त्यांच्या या टॉक शो ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आता त्यांची रोमँटिक वेबसिरीज रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येत आहे.
अभिनेत्री कश्मिरा ताकटे, अभिनेता ऋषिकेश वांबूरकर, अमित रेखी, अभिजित दळवी, ऋषिकेश पाठारे या कलाकारांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने साजिंदे या वेबसिरीज मधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. तर या वेबसिरीजमधून कश्मिरा हिने सिनेविश्वात पदार्पण केले आहे. तर या वेबसिरीजची कथा, पटकथा, संवाद, गीत, संगीत याची जबाबदारी गजेंद्र अहिरे यांनी स्वतः पेलवली आहे. तर या वेबसिरीजच्या संकलनाची बाजू ओंकार परदेशी याने सांभाळली आहे.
याबद्दल बोलताना गजेंद्र अहिरे असे म्हणाले की, एक फिल्म संपली की पुन्हा नवीन प्रयोग करायचा, ही अस्वस्थता कायम मला सतावत असते आणि म्हणूनच मी ‘साजिंदे’ या वेबसिरीजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली, कथा माझ्याकडे तयार होती, शिवाय स्टारकास्टच्या सोबतीने ही आगळीवेगळी कथानक असलेली वेबसिरीज दिग्दर्शित केली. कथा, दिग्दर्शनासह या वेबसिरीजच्या संगीताची बाजूही मी सांभाळली, एकूणच संपूर्ण चित्रीकरणाचा अनुभव विलक्षणीय होता. ‘साजिंदे’ या वेबसिरीजला ओटीटीवर आणण्यासाठी ‘व्हीमास मराठी’ या प्लॅटफॉर्मने उत्तम साथ दिली. त्यामुळेच ही वेबसिरीज आज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading