fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

नाट्य निर्मात्यांनी आपण कुठे कमी पडतोय यांचा विचार करावा – मेघराज राजेभोसले यांचे मत 

 

निर्माते संतोष चव्हाण यांच्या मराठी नाटक ‘जानम समझा करो’ आणि सांगीतिक कार्यक्रम ‘वाजतंय ते गाजतंय’ चा  मुहूर्त संपन्न

पुणे : अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाकडे ७ हजारांहून अधिक चित्रपट निर्माते मात्र पाचशे सुद्धा कार्यारत नाहीत पुण्यातील १० सुद्धा सक्रिय नाहीत ; तसेच नाट्य निर्मिती संस्था  सुद्धा ५५ हुन अधिक आहेत मात्र ५ सुद्धा सक्रिय नाहीत हे वास्तव आहे. बालगंधर्वच्या वर्धापन दिनानिमित्त चार दिवस सर्वजण उत्साही असतात मात्र त्यांनानंतर पुन्हा जैसे थे स्थिति असते. असे का? यांचा विचार करण्याची गरज आहे. मुंबईचे ३ – ४ निर्माते येतात आणि हाऊसफुल चा बोर्ड लावतात. आपण निर्मिती मूल्यांमध्ये, प्रसिद्धी मध्ये नेमके कुठे कमी पडत आहोत यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे असे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केले. 

पुण्यात स्वर सर्वेश प्रोडक्शन आणि सर्वज्ञ नाट्य संस्था  यांच्या संयुक्त विद्यामाने  मराठी नाटक दिग्दर्शक विनोद खेडकर  यांच्या ‘जानम समझा करो’ आणि नृत्य दिग्दर्शक अर्जुन जाधव यांच्या  बहारदारनृत्य संगीताचा कार्यक्रम ‘वाजतंय ते गाजतंय’ या कार्यक्रमाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला यावेळी मेघराज राजेभोसले बोलत होते. याप्रसंगी दोन्ही कार्यक्रमांचे निर्माते संतोष चव्हाण, अभिनेते माधव अभ्यंकर, ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश देशमुख, अभिनेते सुरेश विश्वकर्मा,अभिनेता चेतन चावडा, हेमंत एदलाबादकर, मिलिंद शिंत्रे, योगेश जाधव, सागर पाठक, प्रशांत तपस्वी, विवेक वाघ,आदि मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना मेघराज राजेभोसले म्हणाले, आपले निर्माते नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेत उतरल्यानंतर सेट पासून काटकसर करायला सुरुवात करतात, ५ – १० प्रयोग करूया हे आपल्याच डोक्यात येते, कलाकारांची निवड त्यांचे प्रश्न या सर्व प्रक्रियेत एकसंघपणा दिसत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. निर्मात्याला प्रत्येक प्रयोगाला येणे शक्य नसते यामुळे इतर सर्वांनी जबाबदारी, शिस्तीने वागले पाहिजे, शिस्त कलेसाठी असते.  सर्वांनी आपलं म्हणून केलं पाहिजे, पुण्यात मोठे प्रयोग शक्य आहेत, नवीन कलावंतांना संधि आणि पर्यायी व्यवस्था या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत  जेणेकरून नाटकांचे प्रयोग, दौरे थांबणार नाहीत यांची काळजी कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांनी घ्यावी असे आवाहन राजेभोसले यांनी केले. 

निर्माते संतोष चव्हाण म्हणाले, मराठी नाटक ‘जानम समझा करो’ आणि  बहारदारनृत्य संगीताचा कार्यक्रम ‘वाजतंय ते गाजतंय’ हे दोन वेगळ्या घाटणीचे कार्यक्रम एकाचवेळी रंगमंचावर आणत आहोत यांचा आनंद वाटतोय. आमच्या दोन्ही कलाकृतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत त्याला रसिकांची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वा. जानम समझा करो’, तर सायंकाळी ५:३० वा. ‘वाजतंय ते गाजतंय’ पहिला प्रयोग रामकृष्ण मोरे नाट्यगृह पिंपरी येथे होणार असल्याचेही संतोष चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading