fbpx

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राजीनामा द्यावा महिला काँग्रेसची मागणी

पुणे: भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात अवैधरित्या बार चालविते त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मंडळातून त्यांची हाकलपट्टी करावी, अशा स्वरुपाची मागणीे काँग्रेसच्या प्रसार माध्यमाचे आणि प्रचारप्रमुख पवन खेडा यांनी केली होती.
त्यावर स्मृती इराणी भलत्याच संतापल्या होत्या. त्यांनी काँग्रेस नेते माझ्या मुलीच्या चारित्र्यावर हल्ला करत आहेत.असे आरोप केले होते. त्यावर काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून. फसवेगिरी आणि भ्रष्टाचार विरोधात स्मृती
इराणी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आज आंदोलनातून पुणे शहर महिला काँग्रेस तर्फे मागणी करण्यात आली.
हे आंदोलन पुण्यात गुडलक चौक येथे करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद यांनी केले. या आंदोलनाला संगीता तिवारीउपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी, नीता परदेशी , वैशाली मराठे, ज्योती परदेशी, स्वाती शिंदे, सिमा महाडिक, योगिता सुराणा व पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या आंदोलनाच्या वेळी पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यां कडून तू परेशन है आखबार से*गोवा परेशान तेरे दारू के बार से अशा घटना देण्यात आल्या.
संगीता तिवारी म्हणाल्या, केंद्रातील भाजप सरकार हे सगळ्यांना सांगत असते की आम्ही भ्रष्टाचार केला नाही. पण या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीने गोव्यात फक्त एका नावाच्या व्यक्तीवर दारूचे एकच लायसन असण्याची परवानगी असतानाही दोन लायसन काढली. हा भ्रष्टाचार झाला नाही का. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांची कुठल्याही प्रकरणात काही चूक नसताना त्यांची चौकशी केली. या भ्रष्टाचार केंद्रीय मंत्री इराणी यांची पण चौकशी ईडी ने केली पाहिजे. स्मृती इराणी यांनी राजीनामा दिलापाहिजे. अशी आमची आज या आंदोलनातून मागणी आहे असे संगीता तिवारी म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: