fbpx
Saturday, April 27, 2024
BusinessLatest News

हेम्पस्ट्रीटकडून ४०० पेक्षा अधिक आयुर्वेदिक डॉक्टरांसोबत भागीदारीची घोषणा 

मुंबई : हेम्पस्ट्रीटया भारताच्या आयुर्वेदिक उपचारांच्या क्षेत्रातील रिसर्च ते रिटेल क्षेत्रातीलपहिल्या कंपनीने या भागीदारीद्वारे ४०० पेक्षा अधिक मुंबईस्थित आयुर्वेदिकडॉक्टरांसोबत भागीदारी केली आहे. हेम्पस्ट्रीट पेनकिलर्सच्या गंभीरदुष्परिणामांपासून लोकांचे रक्षण करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर पसरलेल्याआजारांपासून लोकांना मदत करण्यासाठी मोहीम सुरू ठेवणार आहे याशिवाय या भागीदारीतूनहेम्पस्ट्रीटला मुंबईतील ४०,००० हून अधिकरूग्णांपर्यंत पोहोचणे आणि वेदनांच्या व्यवस्थापनासाठी आयुर्वेदावर आधारितउत्पादनांबाबत जाणीव जागृती निर्माण करणे शक्य होणार आहे 

हेम्पस्ट्रीट ही कंपनीनैसर्गिकरित्या दिलासा देणाऱ्या वेदनाशामक उत्पादनांच्या निर्मितीसाठीआयुर्वेदाच्या पुरातन लोकप्रियतेचा पुरेपूर उपयोग करत आहे. हेम्पस्ट्रीट आणितिच्यासोबत भागीदारीत असलेले आयुर्वेदिक डॉक्टर रोपांवर आधारित उत्पादनांवर लक्षकेंद्रित करतात. आरोग्यसेवा क्षेत्रातील सर्वांत मोठ्या समस्यांपैकी एक असलेल्यावेदना व्यवस्थापनासाठी कॅनाबीजच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याचे ध्येयआहे.आयुर्वेदातील मोठ्या प्रमाणावरील कॅनाबीजवर तयार केलेली औषधे आणि आयुर्वेदिकडॉक्टरांसोबतच्या भागीदारीद्वारे हेम्पस्ट्रीट गंभीर आजारांच्या उपचारांसाठी कामकरत आहे. आगामी वर्षांत हेम्पस्ट्रीट ३००,००० डॉक्टर्स आणि मुंबईतील ५,००० क्लिनिक्सना सहभागी करून घेण्याची योजना करत आहे.

हेम्पस्ट्रीट ही भारतातील एकमेवअशी संस्था आहे, जी पारंपरिक आयुर्वेदातीलकॅनाबीजवर आधारित उत्पादनांवर संशोधन, रिटेलिंग आणि विक्री करते.

हेम्पस्ट्रीटच्या सहाय्यक उपाध्यक्ष डॉ. पूजा कोहली या भागीदारीबाबत बोलताना म्हणाल्या की, “आयुर्वेद ही जीवनशैली आणि निसर्गाची किमया आहे. हीकेवळ एक वैद्यकीय यंत्रणा नाही जी फक्त काही आजारांवर उपचार करते. आमचे ध्येय या भागीदारीमार्फतआमची औषधे आणि राष्ट्रीय पातळीवरील क्लिनिकच्या नेटवर्कद्वारे लाखो लोकांपर्यंतपोहोचण्याचे आहे. आम्हाला विश्वास आहे की, ही भागीदारी पारंपरिक कॅनाबीजवर आधारितउत्पादनांच्या निर्मितीसाठी मार्ग खुला करेल.”  कोहलीआयुर्वेद पंचकर्म सेंटर, लोअर परळचे मुख्य आयुर्वेद सल्लागार डॉ. के. आर. कोहली म्हणाले की, “हेम्पस्ट्रीट ही अशी एकमेव कंपनी आहे, जी पारंपरिक आयुर्वेदिक कॅनाबीजवर आधारित औषधांचेसंशोधन ते रिटेल आणि उत्पादन यांच्यावर काम करते आहे. पूर्वीच्या काळी आयुर्वेदातलिहिल्याप्रमाणे वैद्य कॅनाबीजवर तयार केलेली औषधं वापरत असत. परंतु अशा अधिकृत आणि प्रमाणीकृत औषधांचीउपलब्धता हे एक आव्हान होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading