fbpx

आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया संघांची स्पर्धेत विजयी सलामी !

पुणे :  स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या या स्पर्धेत आदर्श रावल याच्या ७९ धावांच्या जोरावर आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २२ यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ४२ धावांनी पराभव केला. पावसामुळे सामना २४-२४ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्यांदा फलंदाजी करताना आर्यन्स् संघाने २४ षटकात १९० धावांचा डोंगर उभा केला. आदर्श रावल याने ७९ धावांची तर, अर्णव पाटील याने ५९ धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी १०४ चेंडूत १४१ धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या आव्हानाला उत्तर देताना २२ यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव २४ षटकात १४८ धावांवर मर्यादित राहीला.

इद्रीस हकीम याच्या नाबाद ७५ धावांच्या जोरावर गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया अ संघाने सनराईझ क्रिकेट स्कूल संघाचा ९ गडी राखून सहज पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना सनराईझ क्रिकेट स्कूल संघाने ३० षटकात १२३ धावांचे आव्हान उभे केले. ओम पवार याने ४० धावांचे योगदान दिले. गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया संघाने हे आव्हान २१.२ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केले. इद्रीस हकीम याने नाबाद ७५ धावा तर, हर्षदीप सिंग याने नाबाद २८ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी १२० चेंडूत १२३ धावांची अभेद्य भागिदारी करून संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २४ षटकात ६ गडी बाद १९० धावा (आदर्श रावल ७९ (५५, १० चौकार), अर्णव पाटील ५९ (५८, ५ चौकार), श्रेयस शिवरकर ३-३५);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी आदर्श आणि अर्णव यांच्यात १४१ धावा (१०४) वि.वि. २२ यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २४ षटकात ८ गडी बाद १४८ धावा (निलमेघ नागवकर ६६ (६०, ६ चौकार, १ षटकार), शिवम गोरे २६, आदर्श रावल २-१६); सामनावीरः आदर्श रावल;

सनराईझ क्रिकेट स्कूलः ३० षटकात ९ गडी बाद १२३ धावा (ओम पवार ४०, आदित्य खाटे १९, इशान शर्मा ४-२०) पराभूत वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया अः २१.२ षटकात १ गडी बाद १२४ धावा (इद्रीस हकीम नाबाद ७५ (७३, १० चौकार, ३ षटकार), हर्षदीप सिंग नाबाद २८);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी १२३ (१२०); सामनावीरः इद्रीस हकीम.

Leave a Reply

%d bloggers like this: