fbpx

एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली होती-शरद पवार

पुणे: आमचे नेते एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी आली होती तरी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा दिली नव्हती असा आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला होता.
यावरून बरेच आरोप प्रात्यारोप झाले आहेत. त्यानंतर शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली होती. अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
शरद पवार आज पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते.
शरद पवार म्हणालेसुरक्षा कुणाला द्यायची आणि का द्यायची हा निर्णय घेण्यासाठी राज्याचा मुख्य सचिव, आणि पोलिस अधिकाऱ्यांची एक समिती असते ते निर्णय घेत असतात. आज माझी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट झाली होती. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. त्यामुळे त्यावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही. असं पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, आम्ही छातीवर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि दिल्लीतून निर्णय आल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, “त्यांनी दगड छातीवर ठेवू की डोक्यावर ठेवू आम्हाला काय त्याचं? त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे.असं शरद पवार म्हणाले आहेत.
त्याचबरोबर राज्यातील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलताना पवार म्हणाले की, राज्याची सत्ता त्या दोघांनीच चालवायचं ठरवलं दिसतंय आणि त्याला त्यांच्या राज्यातील सहकाऱ्यांची आणि केंद्रातील नेतृत्वाची साथ आहे. ते आता सत्ताधारी आहेत म्हणून साहजिकच ते जे काय करतील ते आपल्याला स्विकारावं लागेल.असं मत व्यक्त करत शरद पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: