Monday, October 26, 2026
Latest NewsPUNE

उद्योजक राकेश जैन यांच्यावतीने सरस्वती अनाथ आश्रमास शालेय साहित्य भेट

पिंपरी : काळेवाडी येथील उद्योजक राकेश जैन यांनी दापोडी येथील सरस्वती अनाथ शिक्षण आश्रमास शालेय साहित्य आणि आर्थिक स्वरूपात मदत केली.  आपली सामाजिक बांधिलकी जपत दापोडी येथील सरस्वती अनाथ शिक्षण आश्रमास शालेय साहित्य आणि आर्थिक मदतीचा धनादेश अनाथ आश्रमाचे अध्यक्ष देविदास सुरवसे यांच्याकडे सुर्पूत केला. यावेळी राकेश जैन, पंकज शहा, वसंत कोकणे (अध्यक्ष, लायन्स क्लब काळेवाडी), प्रदीप सोनिग्रा, भरत भूमावत आदी उपस्थित होते. राकेश जैन यांनी नुकतीच झालेली आषाढी वारीतही अन्नदान केले होते. त्याप्रमाणे वेळोवेळी अन्नदान करणे, ब्लँकेट आणि कपडे दान करणे उप्रकम राबवित असतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading