fbpx

फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 520 शिबिरे; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची माहिती

पुणे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपच्या वतीने 520 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, त्या माध्यमातून 52 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कळविली आहे.

मुळीक म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आरोग्य सेवा उपक्रमाने साजरा केला जाणार आहे. त्यासाठी मंडल स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 75 शिबिरे होणार आहेत. त्याशिवाय पक्षाच्या सर्व आघाड्या, मोर्चे आणि प्रमुख पदाधिकारी शिबिरे आयोजित करणार आहेत.

बाल आरोग्य तपासणी, महिलांची तपासणी, ज्येष्ठ नागरिक तपासणी या शिबिरांबरोबर ह्दय रोग, रक्तदाब, मधुमेह, दंतचिकित्सा, नेत्र तपासणी, हाडांची ठिसूळता अशा विविध शिबिरांचा समावेश आहे. या शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: