fbpx
Wednesday, May 15, 2024
Latest NewsPUNE

संत रचना व अभंग यावर आधारित सांगीतिक कार्यक्रम ‘नामाचा गजर’ येत्या २३ तारखेला

पुणे  :  ‘नामाचा गजर’ हा संत रचना व अभंग यावर आधारित सांगीतिक कार्यक्रम  येत्या २३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता मयूर कॉलनी, कोथरूड येथील  बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृह येथे संपन्न होणार आहे. कलाश्री संगीत मंडळ व जे. व्ही. इंगळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाला सवाई मसालेचे राहुल जाधव आणि विश्वेश्वर सहकारी बँकेचे सहकार्य लाभले आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर रसिकांना प्रवेश विनामूल्य असेल. २०१५ ते २०१९ अशी सलग ५ वर्षे हा कार्यक्रम कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित करण्यात येत आहे. गेली २ वर्षे कोरोनामुळे कार्यक्रम होऊ शकला नाही.

यंदाच्या  कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक उस्ताद रईस बाले खाँ आणि हाफिज बाले खाँ हे गायकाच्या रुपात आपल्याला दिसतील. कार्यक्रमात हे दोन्ही कलाकार संतरचना आणि अभंग सादर करतील. रईस आणि हाफिज खाँ बंधू हे धारवाड घराण्याचे प्रसिद्ध सतारवादक उस्ताद रहिमत खान यांचे नातू, तर उस्ताद बाले खान यांचे पुत्र व शिष्य आहेत. त्यांनी भारतात आणि विदेशातही आपली कला सादर केली आहे. याशिवाय  शाश्वती चैतन्य, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र व शिष्य व किराणा घराण्याचे गायक पं. श्रीनिवास जोशी, नातू विराज जोशी आणि किराणा-ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका सावनी शेंडे -साठ्ये हे कलाकार देखील कार्यक्रमात अभंग आणि संतांच्या रचना सादर करतील. या सर्व प्रमुख कलाकारांना पांडुरंग पवार (तबला), रोहित मुजुमदार (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम), गंभीर महाजन (पखवाज) आणि रवींद्र पंडित (टाळ) हे कलाकार साथसंगत करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading