fbpx

ना स्वच्छ्ता, ना पिण्याचे पाणी पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनींचे हाल

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात वसतिगृहात राहतात. ऐन पावसाळ्यात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव, गरम पाण्याचा अभाव, अस्वच्छता यामुळे विद्यार्थिनींना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे विद्यापीठ विभागाच्या वतीने कुलसचिव प्रफुल्ल पवार यांची भेट घेऊन या विषयांवर त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले –
१) वसतिगृहातील Late Pass-Out Pass पूर्वी प्रमाणे सुरू करावे.
२) सर्व वसतिगृहातील पिण्याचे पाणी व वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ व कायमस्वरूपी सोडवावा.
३) गरम पाण्याची व्यवस्था करावी.
४) स्वच्छता आणि दुरुस्ती-देखभाल तत्काळ करून घ्यावी.
५) वसतिगृह प्रथमोपचार केंद्रात सुविधा असाव्यात.
६) वसतिगृह वाचनालय सुरू करावेत.
७) विद्यार्थिनी साठी पूर्वीप्रमाणे बस सुविधा सुरू करावी. अशा विविध मागण्यांना घेऊन यावेळी अभाविप च्या वतीने 

सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा देखिल अभाविप कार्यकर्ता श्रावणी मेस्त्री यांनी दिला. यावेळी चंदाराणी खलाटे, नेहा कदम महादेव रंगा, महेश रहाणे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: