fbpx

लोकशाहीर अण्णा भाऊंच्या विचाराने समाजवादी भारताचे स्वप्न साकार होईल – सुशीलकुमार शिंदे

पुणे : महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल व झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्ताने परिसंवाद व पुरस्कारर्थींचे सन्मान एस एम जोशी सभागृह पुणे येथे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी सुशीलकुमार शिंदे (मा. केंद्रीय गृहमंत्री), रुपाली चाकणकर (महिला आयोग अध्यक्षा महाराष्ट्र), कुमार, सप्तर्षी (विचारवंत), आचार्य रत्नलाल सोनाग्रा (विचारवंत), भगवानराव वैराट, (अध्यक्ष झोसुद) डॉ. बजरंग कोरडे, (विचारवंत) आदी  उपस्थित होते.

या प्रसंगी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे”भूषण पुरस्काराने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मिंलीद गायकवाड, बेटी बचाव बेटी पढाव ट्रस्ट अध्यक्षा गुरूमित कौर, बांधकाम व्यावसायिक किशोर ठक्कर, चित्रपट निर्माते डाॅ.अनिरबन सरकार, आरोग्य सेवा मंडळ, उपसंचालक डॉ.संजोग कदम, सर्वोपचार ससून रुग्णालय अधिष्ठाता डॉ.विनायक काळे इत्यादींना” शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की लोकशाहीर अण्णा भाऊंनी ज्या कादंबऱ्या लिहल्या त्या कादंबऱ्यात स्त्रियांविषयी दर्जात्मक लिखाण केले आहे. वाटेगाव ते मुंबई हा अण्णांचा प्रवास थक्क करणारा आहे. गव्हाणकर, अमर शेख आणि अण्णा भाऊ ही त्रिसूत्रीचे महाराष्ट्रासाठी योगदान महत्वाचे आहे. वैराटांचे झोपडपट्टी धारकांसाठी केलेले कार्य मोलाचे आहे.

कुमार सप्तर्षी म्हणाले की लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे समाजवादी भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी समाजात एकजुट महत्वाची आहे. त्यांच्या लेखनातून समाजाचे त्यांनी वास्तववादी जीवन मांडले आहे. साहित्यातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या की समाजाला योग्य दिशा देण्यासाठी अण्णा भाऊंच्या विचारांची देवाणघेवाण होणे ही काळाची गरज आहे. अण्णा भाऊंनी समाजाला दर्जेदार साहित्य दिले. झोपलेल्या समाजाला जागे करण्यासाठी अशा परिसंवादांचे वेळोवेळी आयोजन होणे काळाची गरज आहे.

भगवानराव वैराट म्हणले की, अण्णा भाऊंना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं. अण्णांचे साहित्य समाजाला दिशा देणारे आहे. पुरोगामी विचारांसोबत मी सदैव असून आपण सगळ्यांनी हा विचार अंमलात आणला पाहिजे.

यावेळी सुलक्षणा धर शिलवंत, अँड राहिल मल्लिक ह्यांच्या उपस्थितीत “अण्णा भाऊ साठे” जीवनावर विचार मांडण्यात आले. गणेश लांडगे, महमद शेख, चंद्रशेखर पिवळे, आबा शिंदे, संतोष कदम, सुरेखा भालेराव, संतोष बोथाळजी, दत्ता डाडर, दत्ता कांबळे, संतोष पिल्ले, सुनील भिसे, हरिभाऊ माने, संतोष सोनवणे, प्रशांत नेटके आदींनी कार्यक्रसाठी श्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. तर आभार काशिनाथ गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: