fbpx

कलाश्री संगीत मंडळातर्फे देण्यात येणारा ‘वैष्णव’ पुरस्कार पंडित हेमंत पेंडसे यांना जाहीर

पुणे  : प्रसिद्ध शास्त्रीय गायक व पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पंडित हेमंत पेंडसे यांना कलाश्री संगीत मंडळातर्फे दिला जाणारा ‘वैष्णव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ह.भ.प विश्वानाथ महाराज इंगळे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा हा पुरस्कार अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील उल्लेखनीय योगदानासाठी देण्यात येतो. रुपये ११००० रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २३ जुलै रोजी एमईएस सभागृह, बालशिक्षण प्रशाला, मयूर कॉलनी, कोथरूड येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात सदर पुरस्कार टेकएक्स्पर्ट ग्रुपचे संचालक जे. व्ही. इंगळे यांच्या हस्ते पं. हेमंत पेंडसे यांना प्रदान करण्यात येईल. औंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष अभिजित गायकवाड यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असेल. याआधी हा पुरस्कार पंडित शौनक अभिषेकी, पंडित श्रीनिवास जोशी, विदुषी देवकी पंडित आणि पंडित आनंद भाटे यांना देण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: