गुरुपोर्णिमा निमित्त कवी संमेलन व गुरुजन गौरव
अद्वै्त क्रीडा केंद्र पुणे व नाट्य-चित्र व कला अँकॅडमी पुणे आयोजित गुरुपोर्णिमा निमित्त कवी संमेलन व गुरुजन गौरव समारंभ कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध जेष्ठ कवी, गीतकार मा.जयंत भिडे साहेब होते प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्यक नरेंद्र आढाव, कवि संमेलन अध्यक्ष प्रा रुपाली अवचरे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कसबा विभाग कार्यध्यक्ष दिपक पोकळे, अद्वैत क्रीडा संस्थेचे अध्यक्ष डॉ मदन कोठुळे, सचिव युवराज दिसले, नाटय चित्र कला चे अध्यक्ष सुर्यकांत तिवडे इ मान्यवर उपस्थित होते
यावेळी पत्तीस कवी नी आपली कविता सादर केली तसेच समाजातल्या आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या दहा मान्यवराचे गुरुजन गौरव म्हणुन यामध्ये ह.भ.प चंद्रकांत भोरेकर, महेश पुरंदरे, प्रा.सुनिल शिवले, मोहन मोरे, प्रा अरविंद शिवले, स्नेहल देशमुख, धनश्री जोशी, अनुराधा घोरपडे, संभाजी वाघ, संदिप जगदाळे यांचे अध्यक्ष च्या हस्ते शाल,प्रमाणपत्र, बुके, नारळ देऊन सत्कार करण्यात आले
हया कार्यक्रमाचे नियोजन सौ मंजिरी मदन कोठुळे यांनी केले सुत्रसंचालन सीताराम नरके यांनी केले स्वागत प्रदर्शन नंदकुमार पाटील यांनी केले आभार प्रदर्शन उद्धव पवार यांनी केले यावेळी मोठ्या प्रमाणात कवी रसिक उपस्थित होते