Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पानशेत धरणातील पाणीसाठा 40.97 टक्क्यांपर्यंत वाढला

पुणे,: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
खडकवासला धरण तर जवळजवळ पूर्ण म्हणजे 95.51 टक्के भरले असून पानशेत धरणातील पाणीसाठा 40.97 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सध्या 53.40 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. हे धरण एकूण क्षमतेच्या 95.51 टक्के भरले आहे.
टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 160 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 29.04 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 27.65 टक्के भरले आहे.
वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 140.44 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 38.67 टक्के भरले आहे.
पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 93 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 123.57 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 40.97 टक्के भरले आहे
.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading