fbpx

‘हप्‍पू की उलटन पलटन’ टीमने साजरा केला ८०० एपिसोड्स पूर्ण करण्‍याचा क्षण!

कॉमेडी ही सर्वात अवघड शैली मानली जाते आणि काहीच कलाकार सातत्‍याने प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करण्‍यामध्‍ये यशस्‍वी होतात. दरोगा हप्‍पू सिंग (योगेश त्रिपाठी), त्‍याची ‘दबंग दुल्‍हन’ राजेश (कामना पाठक) आणि त्‍याची हट्टी आई कटोरी अम्‍मा (हिमानी शिवपुरी) यांची ‘घरेलू कॉमेडी’ व विनोदी गमतीजमतींसाठी लोकप्रिय असलेली एण्‍ड टीव्‍हीवरील ‘हप्‍पू की उलटन पलटन’ ही अशाच प्रकारची एक मालिका आहे, जी एकामागोमाग एक हसवून-हसवून लोटपोट करणा-या एपिसोड्ससह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. यशस्‍वी ८०० एपिसोड्सच्‍या पूर्ततेमधून प्रेक्षकांमधील मालिकेची लोकप्रियता दिसून येते.

या यशाबाबत बोलताना योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्‍पू सिंग म्‍हणाले, ”तीन वर्षांपासून मालिकेचा यशस्‍वी प्रवास साजरीकरणासाठी मोठे कारण आहे आणि आता ८०० एपिसोड पूर्ण होण्‍याचा टप्‍पा उत्‍साहामध्‍ये अधिक आनंदाची भर आहे. प्रेक्षकांसाठी आम्‍ही निर्माण केलेल्‍या धमाल आठवणी संपूर्ण टीमसाठी अभिमानास्‍पद आहेत. आम्‍ही जेथे जातो तेथे आमचे चाहते आमच्‍या धमाल संवादांसह आम्‍हाला अभिवादन करतात, जे आमच्‍यासाठी सर्वोत्तम कौतुक आहे. मी आमच्‍या अद्वितीय विनोदी कन्‍टेन्‍टची नेहमीच प्रशंसा करण्‍यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. आमची अधिकाधिक विनोदी एपिसोड्ससह सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहण्‍याची इच्‍छा आहे.”
कामना पाठक ऊर्फ राजेश हप्‍पू सिंग म्‍हणाल्‍या, ”८०० एपिसोड्स पूर्ण करण्‍यामधून संपूर्ण क्रिएटिव्‍ह व सपोर्ट टीमची प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम विनोदी मालिका सादर करण्‍याप्रती अथक मेहनत दिसून येते. माझा विश्‍वास आहे की, राजेशची भूमिका साकारताना माझ्या जीवनात आनंद येण्‍यासोबत सर्व चाहत्‍यांना प्रचंड आनंद व मनोरंजन देखील मिळाले आहे.” हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्‍मा म्‍हणाल्‍या, ”अशा यशाने कलाकारांना कर्तुत्‍वाची जाणीव होते आणि आपण योग्‍य दिशेने वाटचाल करत आहोत हा विश्‍वास दृढ होतो. मला आनंद होत आहे की, प्रेक्षक एकत्र विनोदी एपिसोड्स पाहण्‍याचा आनंद घेत आहेत आणि यामधून आम्‍हाला असे अधिक अद्भुत एपिसोड्स सादर करण्‍यास प्रेरणा मिळते.’

Leave a Reply

%d bloggers like this: