fbpx

समाविष्ट २३ गावांतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय

पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांतील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात एका गावाचे काम हाती घेणार आहे. त्यामुळे तब्बल २५ वर्षांनंतर या गावातील मिळकतदारांना मालकी हक्काचा पुरावा मिळणार आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीत १९९७ मध्ये गावे समाविष्ट केली. त्यांचे सर्वेक्षण करून तेथील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाला काही निधी दिला होता. त्यानुसार २००७ मध्ये समाविष्ट गावांतील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण केले. मात्र, त्यास परवानगी देण्यास सरकारकडून विलंब झाला, त्यामुळे हे काम थांबले होते. राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतरही त्यात अनेक अडचणी निर्माण झाल्याने हे काम पुन्हा थांबले. मध्यंतरी राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर ते पूर्ण करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला होता.
पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट गावांतील मिळकतदारांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी भूमी अभिलेख विभाग आणि महापालिका यांची नुकतीच एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात एका गावाचे सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड देणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: