ऑटोमेशन टेक्नॉलॉजी लघू आणि मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचायला हवी – डॉ.विजयकुमार सारस्वत
पुणे: ऑटोमेशन तंत्रज्ञान आणि विश्लेषण क्षमता ही मोठ्या उद्योगांबरोबरच लघू आणि मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचायला हवी असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ.विजयकुमार सारस्वत यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असणाऱ्या सिफोरआयफोर (इंडस्ट्री ४. ओ) या लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी व अद्यायावत तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारच्या समर्थ उद्योग भारत उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या लॅबला डॉ.सारस्वत यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रशांत श्रीनिवासन, उद्योगपती राहुल किर्लोस्कर, राजेंद्र देशपांडे, कृष्णा भोजकर, एसपीपीयू रिसर्च पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अरविंद शाळिग्राम, सिफोरआयफोरचे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ.सारस्वत म्हणाले, भारतीय परिस्थिती लक्षात घेता किफायशीर उपाय विकसित करण्यावर भर द्यायला हवा. डेटावर आधारित निर्णय क्षमता वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. या भेटीदरम्यान त्यांनी सिफोरआयफोरच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले.