fbpx

डॉ .प्रचिती पुंडे मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत “वुमन मिसेस युनिवर्स टोलरन्स” पुरस्कराच्या मानकरी

पुणे – डॉ.  प्रचिती पुंडे या मिसेस युनिव्हर्स २०२२ स्पर्धेसाठी साउथ कोरियाची राजधानी सेऊल येथे गेल्या होत्या या स्पर्धेत विविध स्तरावरील चाचण्यांमधून मिसेस युनिव्हर्स २०२२ या शीर्षका पर्यंत पोहोचावे लागते. त्यांच्याबरोबर 90 देशांच्या सौंदर्यवती तिथे सहभागी झाल्या होत्या.  त्यातल्या अनेक सौंदर्यवतींबरोबर डॉक्टर प्रचिती यांची खूप चांगली मैत्री झाली व त्यांनी एकमेकींना आपल्या देशात आमंत्रित ही केलं. आपापल्या देशाची संस्कृती एकमेकींना माहित व्हावी हा त्यामागचा उद्देश ! या अतिशय अवघड आणि सर्वात जास्त कालावधी असलेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये अनेक देशाच्या सौंदर्यवती स्पर्धेतील अनेक टप्पे पार करत विविध उप आणि मुख्य शीर्षकापर्यंत पोहोचल्या. या दरम्यान परीक्षकांकडून प्रत्येक स्पर्धकाचे परीक्षण चालू होते. 

डॉ प्रचिती स्वतः डॉक्टर असून एक जीवन प्रशिक्षक (Life Couch) आहेत. आत्म निपुणता ( सेल्फ मास्टरी) हा त्यांचा खास विषय आहॆ. हाच धडा देऊन त्यांनी हजारो महिलांना आत्म निर्भर केले आहॆ. शहरातील उच्च राहणीमान आणि त्याच बरोबर ग्रामिण भागातील लोकांच्या पुनर्वसना साठी करीत असलेले कार्य, भारतात त्यांनी निर्मित केलेली घरगुती हिंसाचारा वरची चित्रफीत व त्या द्वारे दिलेला संदेश असा सर्व बाबींचा विचार करून डॉ प्रचिती पुंडे यांना “वुमन मिसेस युनिवर्स टोलरन्स” या उप शीर्षकाने गौरविण्यात आले. संयम, विवेकवृत्ती आणि सामंजस्य या तीन गुणांचा अवलंब केल्यास विश्वशांती सहज शक्य आहॆ या संदेशा मुळे त्या “वुमन मिसेस युनिवर्स टोलरन्स” शीर्षकाच्या मानकरी ठरल्या.

डॉ. प्रचिती यांचा मिसेस युनिव्हर्स स्पर्धे चे मुख्य आयोजक आणि अध्यक्ष, सावा त्सेकोव्ह आणि कोरियन दिग्दर्शक जॉन लिम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी सावा म्हणाले, “मला आनंद आहे आणि अभिमान आहे की तुम्ही या महत्त्वाच्या शीर्षकाचा उपयोग जागरूकता अभियानसाठी आणि शांतता संदेशाला जागतिक स्तरावर पाठिंबा देण्यासाठी कराल” श्रीमती मॅगी त्सेकोव्ह यांनी डॉ प्रचितीचे तिच्या अद्वितीय शीर्षकासाठी अभिनंदन केले ज्यामुळे तिला जागतिक शांतता पसरविण्यात मदत होईल. दिवा पेजंट्सच्या अंजना मास्कारेन्हस (राष्ट्रीय संचालिका) आणि कार्ल मास्कारेन्हस यांनी देखील तिचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: