fbpx

पुणेकर महिलांनी परदेशी भाषा शिक्षणासाठी विद्यानिकेतन शाळेची मुलं घेतली दत्तक

गरीब व वंचित मुलांना मिळणार जर्मन भाषेचे शिक्षण
पुणे : शहरातील महापालिका विद्यानिकेतन शाळेतील गरीब व वंचित मुलांना परदेशी जर्मन भाषेचे शिक्षण मिळावे व त्यांचे उज्ज्वल भविष्य निर्माण व्हावे यासाठी इंनर व्हील क्लब च्या वतीने परदेशी भाषा शिक्षणासाठी गरीब मुलं दत्तक घेऊन समजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे .

जगभरात विविध सामाजिक कार्य करणारा इंनर व्हील हा महिलांची एक सामाजिक संस्था आहे .या संस्थेने देशभर व जगभर आजपर्यंत विविध सामाजिक कार्य केले आहे .पुण्यात ही या संस्थेने पुणे महापालिकेच्या विद्यानिकेतन या शाळेतील गरीब व वंचित गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी विविध उपक्रम राबवित आहे .काही मुलांना शाळेच्या फी भरणे असो अथवा इतर मदत ही संस्था करीत आहे .आज नुकत्याच झालेल्या संस्थेच्या एका कार्यक्रमात विद्यानिकेतन या शाळेतील मुलांना चार स्टेप मध्ये जर्मन भाषेचे शिक्षण देण्यात येणार आहे .
या वेळी इनर व्हील क्लब पुणे रिव्हरसाईड संस्थेच्या पुणे अध्यक्षा माधवी चंदन ,मुक्ती पानसे ,स्मिता पिंगळे ,रजिता गुप्ता ,दीपशिखा पाठक सचिव ,शारदा कनोरीया यासह पुणे शहरातील महिला पदाधिकारी व शाळेतील शिक्षक मुख्याध्याक व परदेशी शिक्षण देणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते .

Leave a Reply

%d bloggers like this: