fbpx

१०८ एमपी कॅमेरासह इन्फिनिक्सने नोट १२ ५जी सिरीज लाँच केली

मुंबई :  आपला पहिला ५जी स्मार्टफोन ‘झीरो ५जी’ला मिळालेल्या भव्य यशानंतर इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने आज विभागातील त्यांची पहिली सिरीज नोट १२ ५जी चे अनावरण केले. प्रिमिअम पण किफायतशीर असलेले नवीन नोट १२ ५जी आणि नोट १२ प्रो ५जी पॉवर-पॅक कार्यक्षमतेसह फ्यूचर-रेडी अनुभवांचा शोध घेत असलेल्या युजर्ससाठी सर्वात लोकप्रिय डिवाईसेस असतील. नोट १२ ५जी आणि नोट १२ प्रो ५जी मध्ये १२ ५जी बॅण्ड्सचा सपोर्ट असेल, तसेच हे दोन्ही डिवाईसेस १५ जुलैपासून फ्लिपकार्टवर अनुक्रमे १४,९९९ रूपये आणि १७,९९९ रूपये या स्पर्धात्मक किंमतींमध्ये उपलब्ध असतील.

नोट १२ ५जी आणि नोट १२ प्रो ५जी मध्ये ग्राहकांना अद्वितीय स्मार्टफोन अनुभव देण्यासाठी सुलभ डिस्प्ले, शक्तिशाली प्रोसेसर, उच्च दर्जाचा कॅमेरा आणि विशाल क्षमतेची बॅटरी अशी उल्‍लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. नोट १२ ५जी ६ जीबी (जवळपास ९ जीबीपर्यंत विस्तारित)/६४ जीबी मेमरी व्हेरिएण्टमध्ये येईल, तर नोट १२ प्रो ५जी ८ जीबी (जवळपास १३ जीबीपर्यंत विस्तारित)/१२८ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल. दोन्ही डिवाईसेस फोर्स ब्लॅक आणि स्नोफॉल व्हाइट या दोन रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये येतील.

इन्फिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनि‍श कपूर म्‍हणाले, “नोट १२ ५जी सिरीजच्या लाँचसह आमचा ग्राहकांना शक्तिशाली डिवाईसेस देण्याचा मनसुबा आहे, जे स्पर्धात्मक किंमतीमध्ये उच्च दर्जाची कार्यक्षमता, आकर्षक डिझाइन व सर्वोत्तम अनुभव देण्यासंदर्भात अग्रस्थानी असतील. नोट १२ ५जी सिरीजमध्ये १२ ५जी बॅण्ड्स आहेत, जे भारतात ५जी नेटवर्क्स उपलब्ध झाल्यानंतर एकसंधी अनुभवाच्या खात्रीसाठी ग्राहकांना विविध वारंवारतांचे सर्वोत्तम कव्हरेज देतात. नोट १२ प्रो ५जी मध्ये विभागातील अग्रणी १०८ मेगापिक्सल कॅमेरा, विभागातील सर्वोत्तम एएमओएलईडी डिस्प्लेसह १८० हर्टझ टच सॅम्प्लिंग रेट आहे आणि हा डिवाईस वाइडवाइन एल१ सपोर्टसह येतो, ज्यामधून गेमिंग किंवा एचडी कन्टेन्ट स्ट्रिमिंग करताना सुलभ व सर्वोत्तम अनुभव मिळतो. तसेच आम्‍हाला विश्वास आहे की, नोट १२ ५जी सिरीज आमच्या ग्राहकांना व चाहत्यांना आवडेल आणि आगामी ५जी स्मार्टफोन्ससाठी बेंचमार्क स्थापित करेल.”

अल्‍ट्रा-स्मूद डिस्प्ले: ६.७ इंच एफएचडी+ एमएओएलईडी डिस्प्ले, ९२ टक्के स्क्रिन-टू-बॉडी रेशिओ, १०८ टक्के एनटीएससी रेशिओ आणि १८० हर्टझ टच सॅम्प्लिंग रेट.

पॉवर-पॅक कार्यक्षमता: मीडियाटेक डी८१० ५जी प्रोसेसर शक्ती आणि अत्यंत गतीशील ड्युअल सिम ५जी सह १२ ५जी बॅण्ड्स व ६ एनएम चिपसेट गतीशील नेटवर्क एकसंधीपणे देतात.

प्रगत कॅमेरा: नोट १२ ५जी मध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा लेन्स आहे, तर नोट १२ प्रो ५जी मध्ये विभागातील अग्रणी १०८ मेगापिक्सल कॅमेरा आहे, ज्याला डी८१० ५जी चिपसेटचे पाठबळ आहे, ज्यामुळे डिवाईस आकर्षक फोटोज कॅप्चर करतो.

मेमरी व्हेरिएण्ट्स: नोट १२ ५जी – ६ जीबी (जवळपास ९ जीबीपर्यंत विस्तारित)/६४ जीबी इंटर्नल स्टोरेजसह एलपीडीडीआर४एक्स रॅम, नोट १२ प्रो ५जी – ८ जीबी (जवळपास १३ जीबीपर्यंत विस्तारित)/१२८ जीबी स्टोरेजसह एलपीडीडीआर४एक्स रॅमसह येतो.

विशाल क्षमतेची बॅटरी: ५००० एमएएच बॅटरीसह पॉवर मॅरेथॉन टेक असलेल्या दोन्ही डिवाईसेसमध्ये ३३ वॅट फास्ट चार्जिंगसह टाइप सी केबल आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: